31.9 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » पत्रकार संघाचे उपक्रम दिशादर्शक डॉ.पै.तानाजी जाधव
महाराष्ट्र

पत्रकार संघाचे उपक्रम दिशादर्शक डॉ.पै.तानाजी जाधव

किशोर पाटील/महाराष्ट्र
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपक्रम हे दिशादर्शक आणि सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तिं पत्रकारांच्या न्यायासाठी ठामपणे उभे राहणे दिशादर्शक आहे असे प्रतिपादन टायगर ग्रुपचे अध्यक्ष पै.डाॅ.तानाजी भाऊ जाधव यांनी केले. तर १८ वर्ष गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा हा उपक्रम दरवर्षी राबविणे हे कौतुकास्पद आहे असे मत आमदार डॉ किरण लहामटे यांनी व्यक्त केले। विरगाव ता अकोले येथे आनंदगड शिक्षण संकुलात आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इयत्ता दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थी व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील कोव्हिडं योध्दा पुरस्कार सोहळा कार्यक्रमात पै. जाधव अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी अकोले विधानसभा सदस्य आमदार डॉ किरण लहामटे, डि.एम उद्योग समुहाचे सागर दोलतोडे, उद्योजक बंडु भागवत, पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, आनंदगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, भाजपचे जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, अकोले ता.एज्युकेशन चे अध्यक्ष जे.डी.आंबरे, पत्रकार संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, अगस्ती चे संचालक सुनील दातीर, अकोले एज्युकेशन संस्थेचे खजिनदार एस पी देशमुख, प स सदस्य अरुण शेळके आदी उपस्थित होते।

लोकप्रिय आमदार किरण लहामटे म्हणाले की, राजकारण चांगले माणस आले तरच समाजाचा विकास होईल, तालुक्यातील उच्च शिक्षित सरपंच झालेमुळे कोव्हिडं ची साथ आटोक्यात राहिली.कोव्हिडं काळात सरपंच, पोलीस पाटील यांचे योगदान आहे त्यांचा सन्मान करणे उचित आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थी व समाजात उत्कृष्ट सामाजिक काम करणार्या व्यक्तिंना सन्मानित करण्यात येते. हे काम विश्वास आरोटे नियमित करतात। पत्रकार संघाचे हनुमान बनुन सर्व पत्रकारांना मायेचा आधार पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे देत आहे. लहान आणि मोठा असा भेद या पत्रकार संघात नाही बत्तीस हजार पत्रकारांचे संघटन जपनारा आणि सामाजिक बांधिलकी ठेवणारा एकमेव पत्रकार संघ हा मराठी पत्रकार संघ आहे असे प्रतिपादन डि एम उद्योग समुहाचे अध्यक्ष सागरभैय्या दोलतोडे यांनी केले। राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संजयजी भोकरे व प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या सहकार्याने सर्वांना सोबत घेऊन चालणारा पत्रकार संघ आहे. कोविड काळात मयत पत्रकारांच्या कुटुंबाला धनादेश देत मदतीचा हात संघाने दिला आहे. पत्रकारांचे विमा व संरक्षण यासाठी राज्या पासुन ते केंद्रापर्यत आपली बाजु मांडीत पत्रकार संघ खंबीर उभा राहत आहे.तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत चे कोविड च्या काळातील काम उल्लेखनीय आहे त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत चा सन्मान झाला पाहिजे त्यास सर्वांनी एकमत करूण पुरस्कार प्रदान केले. संपुर्ण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीस कोविड योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करणारा पत्रकार संघ हा तालुक्यातील प्रथमच आहे याचा आनंद आहे.
यावेळी धुमाळवाडी चे सरपंच रविंद्र गोर्डे, डोंगरगाव चे सरपंच बाबासाहेब उगले, यांनी मनोगत व्यक्त केले. अभियंता दिनाचे औचित्य साधून इंजिनियर सुनील दातीर व अनिल राहणे सर यांचे चिरंजीव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला।

कार्यक्रम यशस्वीते साठी जिल्हाप्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे जिल्हाउपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, तालुकाध्यक्ष अशोक उगले, सचिव अनिल नाईकवाडी, उपाध्यक्ष ललित मुतडक, हरिभाऊ फापाळे, भागवत खोल्लम, जगन्नाथ आहेर, सुरेश देशमुख, सुनील शेणकर, सचिन लगड,संजय टिकेकर,सुनील आरोटे, ओम अस्वले, शंकर संगारे, निखिल भांगरे .प्रविण धुमाळ.राजु जाधव सर्व तालुका कार्यकारिणी तसेच सर्व ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक विद्यार्थी उपस्थित होते. तसेच टायगर ग्रुपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दत्ता जाधव यांनी तर आभार सोशल मिडीया प्रमुख गणेश रेवगडे यांनी मांडले.पत्रकार संघाच्या कार्यक्रमातून समाजामध्ये एकतेचा संदेश पत्रकार हा समाजाचा उल्लेखनीय कार्याची दखल घेतो।

Related posts

दादर फेरीवाला संघटनेच्यावतीने अल्पोपहार वाटप

Bundeli Khabar

महाराष्ट्र राज्य से पंद्रह लाख से अधिक लाभार्थी प्रधानमंत्री मोदी को पत्र लिखेंगे

Bundeli Khabar

क्राइम एन्ड करप्शन कंट्रोल एसोसिएशन कार्यालय का हुआ शुभारंभ

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!