22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
महाराष्ट्र

आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पनवेल जिल्ह्यातील आपटा परिसर स्थित कोरल वाडी या आदिवासी बहुल वस्तीमध्ये “साई परिवार सेवाभावी संस्थेच्या” वतीने २१ वा स्थापना दिवस जीवनावश्यक वस्तू वितरीत करून साजरा करण्यात आला.
सातत्याने एकवीस वर्ष आदिवासी आणि मध्यमवर्गीय कुटुंबीयांमध्ये दुव्याचे काम करणार्‍या मंगेश रासम आणि मनीषा रासम या दांपत्याद्वारा आणि साई परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने ८० आदिवासी कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू एकत्रितपणे वितरित करण्यात आल्या.

मुंबई येथून साई संस्थेतील ५० हून अधिक स्वयंसेवकांनी नंदा फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष स्वप्नील वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथील ग्रामीण भागास भेट देत तेथील मूलनिवासी कुटुंबीयांचे संघर्षमय जीवनमान जाणून घेतले. मंगेश रासम आणि स्वप्नील वाडेकर यांनी ३८ आदिवासी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत पाहणी दौरा केला होता. त्यानंतर अन्नधान्य, वस्त्र, स्वच्छता प्रसाधने तसेच आरोग्य प्रसाधन समवेत दोन लाख रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.

सदर कार्यक्रमासाठी अनिल वाडके, अंकुश रासम, उमेश मांजरेकर, दीपक अाकरे, तुलसीदास तांडेल, विनायक सावंत, स्वाती नाखरेकर, शरद नाक्ती, रामकिरत गुप्ता, अनंत पवार, प्रवीण इंगावले, प्रकाश राशिगकर, डिंपल पांचाळ, स्वप्नील वाडेकर इत्यादी उपस्थित होते.

Related posts

किरण गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी

Bundeli Khabar

हजारों साल बाद धरती पर स्थापित पहला पंचमुख ब्रह्मा मंदिर

Bundeli Khabar

कुर्ला रेल्वे पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेने सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीला केले अटक

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!