30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20220307 WA0004
महाराष्ट्र

१२२ रक्तदात्यांनी यशस्वीरीत्या केले रक्तदान

Bundelikhabar

बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, अभ्युदयनगरचा उपक्रम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, अभ्युदयनगरचा गणराज आणि के. ई. एम. रुग्णालय, परळ यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक ६ मार्च २०२२ रोजी करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये १२२ रक्तदात्यांनी यशस्वीरीत्या रक्तदान केले. त्यावेळी रक्तदात्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आल्या.

के. ई. एम. रुग्णालय रक्तपेढीचे हेमंत सकट, सविता नितनवरे आणि त्यांच्या सर्व सहकारी अगदी योग्यप्रकारे रक्तसंकलन केले. सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संतोष आमडोस्कर, सरचिटणीस शैलेश सकपाळ, खजिनदार गोविंद नाईक, कार्याध्यक्ष निखिल मांडे, अंतर्गत हिशोब तपासणीस योगेश दळवी, तसेच विश्वस्त मोहन मांडे, मंगेश नागांवकर, नरेश जाधव, संतोष पाताडे, मनिष साळकर यांच्यासोबत मंडळाचे उपपदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.


Bundelikhabar

Related posts

उद्या शिक्षक दिनी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

Bundeli Khabar

महाराष्ट्र महिला व्यासपीठाचा पुरस्कार सोहळा संपन्न

Bundeli Khabar

कैलाश मासूम को म्यांमार एम्बेस्सी से मिला ‘बुद्धा पीस अवार्ड’

Bundeli Khabar
error: Content is protected !!