34.4 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रम
महाराष्ट्र

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रम

जि. प. शाळा शिळ, ता. अंबरनाथ जि. ठाणे येथे महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिन साजरा.
अंबरनाथ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी- हुतात्मा दिन आपल्या जि. प. शाळा-शिळ येथे साजरा करण्यात आला.प्रथमता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ .वर्षाताई शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता म.गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.तद्नंतर प्रार्थना गाऊन शासन परिपत्रकाचे वाचन करण्यात आले.”शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे.”असे म्हणत नवी तालीमच्या रूपाने देशाला शिक्षणाची देणगी देणाऱ्या महात्मा गांधीजींचा स्मृतिदिनानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या मन,मनगट,आणि मस्तक याचा विचार तसेच सत्य,अहिंसा आणि सत्याग्रह हे जीवन मूल्य प्रत्येक विध्यार्थ्याच्या मनापर्यंत श्री. संजय मराठे सरांनी आपल्या संवादातून पोहचवले.

स्वावलंबन हा जीवनाचा खरा अलंकार आहे हे तत्व श्री.संजय तांबे सरांनी सांगून गांधीजींच्या तत्वांचे विविध पैलू उलगडून दाखवले.जीवनामध्ये सत्याला कधीच मरण नसते हेही विशद केले. प्रत्येक विध्यार्थ्याने स्वावलंबी बनण्यासाठी प्रत्येकाने स्वताची कामे स्वतः करावी आणि सत्य अंगी बानावे यासाठी आजचा दिवसासारखा दिवस नाही असे सांगून स्वच्छतेचे महत्व विध्यार्थ्याना पटवून देण्यात आले.त्याच प्रमाणे शालेय परिसर आणि बस स्थानक परिसराची स्वच्छता सर्व विध्यार्थी आणि शिक्षकांनी केली.तद्नंतर सर्वाना बिस्कीट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष,सदस्य,शिक्षक,विध्यार्थी उपस्थित होते.

Related posts

सेंसर बोर्ड सदस्य को मिला भारत श्री अवार्ड

Bundeli Khabar

वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रदीप कसबे को मिला मनोर पुलिस स्टेशन का चार्ज

Bundeli Khabar

प्रदूषणाचा भस्मासुर माणसाच आयुष्य संपवत आहे म्हणून ” नो व्हेइकल डे” उपक्रम पेण मध्ये शुभारंभ.

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!