27.3 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20220123 WA0006
महाराष्ट्र

पाण्याची टाकी साफसफाई व निर्जंतुकीकरण मोहिम

Bundelikhabar

शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांचा पुढाकार

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.२०६ चे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या विद्यमाने घरोघरी पाण्याची टाकी साफसफाई व निर्जंतुकीकरण मोहिम घेण्यात आली आहे. २३ जानेवारी शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सदर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत प्रभाग क्रमांक २०६ मधील सर्व इमारती, बैठ्या चाळीं मधील घराघरात असलेल्या पाण्याच्या टाक्या साफ करून देण्यात येणार आहेत.

पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी. त्याच दुषित पाण्यापासून होणारे आजार कॉलरा, हॅपेटायटिस, कावीळ, त्वचा विकार, हगवण, डायरीया आदी टाळण्यासाठी मशीनद्वारे विभागात घरोघरी जाऊन पाण्याची टाकी साफ करून निर्जंतुकीकरण करून देण्यात येणार आहे.

शिवसेना शिवडी विधानसभा शाखा क्रमांक २०६ मधील विभागीय नागरिकांनी आपली नावनोंदणी शाखेत करावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापत्य समिती (शहर) उपाध्यक्ष, विधी व कायदा समितीचे सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच महाराष्ट्र वाहतूक सेना उपाध्यक्ष सचिन पडवळ यांनी केले आहे.


Bundelikhabar

Related posts

कल्याणच्या ताल डान्सबार मध्ये धिंगाणा,पोलिसासह सहा जणांवर गुन्हा दाखल

Bundeli Khabar

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्यावतीने २५० गरीब गरजु मुलांना नाष्टा व मिठाई वाटप

Bundeli Khabar

मुम्बई लोकमान्य तिलक टर्मिनस आरपीएफ थाना अध्यक्ष केशव राणा द्वारा पर्यावरण को स्वच्छ रखने के लिए वृक्षा रोपण किया गया

Bundeli Khabar
error: Content is protected !!