विरार : श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था, संलग्न पश्चिम रेल्वे प्रवासी भजन महासंघाच्या वतीने महारक्तदान शिबिर नुकताच श्री कच्छी विशा जैन संघ, तुलिंज रोड, चार रस्ता, राधाकृष्ण हॉटेलच्या समोर, रामदेव झेरॉक्स सेंटरच्यावर, नालासोपारा पुर्व येथे संपन्न झाला. या मध्ये ११५ महिला व पुरुष रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता.
वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने होणाऱ्या रुग्णाचा मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे तसेच गरजू लोकांना मोफत रक्तपुरवठा करण्याचे काम व सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी सेवाभावी संस्था म्हणून श्री संत सेवा भजन सामाजिक संस्थे (पश्चिम रेल्वे भजन महासंघ) कडे पाहिले जाते. हि १२५ भजन रेल्वे मंडळाची शिखर संस्था आहे.
गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे म्हणून श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था, संलग्न पश्चिम रेल्वे प्रवासी भजन महासंघाच्या माध्यमातून रविवार दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी नालासोपारा पूर्व येथे घेण्यात आला, या प्रसंगी महारक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री वंसत प्रभू, उपाध्यक्ष श्री शिवाजी पाटील, सचिव श्री. जनार्दन धयाळकर, खजिनदार श्री जयराम पवार, सहसचिव कृष्णा सुर्वे, चंद्रकांत गुरव, विनोद बैकर, प्रेमनाथ गुरव, शाहीर नितिन रसाळ, प्रभाकर सावंत राजेंद्र दवंडे व संपूर्ण कार्यकारीणी उपस्थित होती.
महासंघाची स्थापना २००७ साली झाली असून त्याच्या माध्यमातून आरोग्य, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक असे अनेक भजन मंडळ एकत्र येऊन गुढी पाडवा शोभायात्रा, पूरग्रस्त कुटुंबला मदत, कोरोना मध्ये गरजू कुटुंबला अन्नधान्याची मदत, राष्ट्रीय आपत्तीत मुख्यमंत्री सहायता निधी जमा, ५०० पेक्षाजास्त गरजूंना मोफत रक्ताची मदत, सामूहिक आषाढी एकादशी दिंडी सोहळा, पश्चिम रेल्वे मोटर मॅन, गार्ड, व लोकाधिकार समिती पश्चिम रेल्वे आणि शिवजयंती उत्सव मंडळ यांच्या सोबत चर्चगेट रेल्वे स्थानक येथे, दादर, खार, बोरिवली, नालासोपारा या रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहेत.
रक्तदानाचे फायदे :-
• रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. शिवाय, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकादेखील कमी होतो.
• रक्तामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यास हृदयाला यामुळे नुकसान होण्याचा धोका असतो, रक्तदान केल्याने ते कमी होते.
• नियमित स्वरुपात रक्तदान केल्यास अतिरिक्त लोह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
• लाल रक्तपेशीं मध्ये वाढ रक्तदान केल्यानंतर तुमचे शरीर रक्ताची कमतरता भरुन काढण्याचे कार्य सुरू करू लागते. यादरम्यान, शरीरात लाल रक्तपेशी अधिक प्रमाणात निर्माण होतात. यामुळे तुमचे आरोग्य सुधारू लागते आणि शारीरिक कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं होतात.
• रक्तदानामुळे कॅलरीज बर्न होतात तसेच वजन घटण्यासही मदत होऊ शकते. शरीरात लाल रक्तपेशींचा स्तर योग्य प्रमाणात येण्यासही मदत होते. यादरम्यान, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम करुन वजन नियंत्रण आणले जाऊ शकते.
• रक्तदान केल्यानं शरीरात अधिक प्रमाणात असणारे लोह नियंत्रणात आणण्यास मदत होते. यामुळे कॅन्सरचा धोकादेखील कमी होतो.
• निरोगी आरोग्य रक्तदानामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते, रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
• रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी तपासली जाते, संसर्ग, आजारांची तपासणी केली जाते. रक्तचाचणीद्वारे एखादी व्यक्ती रक्तदान करण्यास सक्षम आहे की नाही, याची माहिती मिळते.
कोरोना आणि राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी प्रत्येकाला रक्ताची गरज पडते हि गरज श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था (रजि.) या महासंघाने ओळखली आहे. माजी जिल्हाअध्यक्ष शिवसेना शिरीष चव्हाण, माजी नगरसेवक स्वप्निल बांदेकर, बीजेपी पालघर जिल्हा अध्यक्ष राजन नाईक, राजेश वर्मा, कॅप्टन डॉ. योगेशचंद्र शर्मा, शिवसेना युवा नेते पंकज देशमुख, माझी नगरसेवक किशोर पाटील, शिवाजी भानत, राम उतेकर, प्रदिप गमरे, नितेश धुळप, दिपेश शेडगे, जीवन मोरे, उपस्थित होते, विजयी ब्लड बँकचे डॉ.पराग मोरे व पूर्ण टिम यांचे विशेष सहकार्य लाभले अशी माहिती संस्थेचे सल्लगार विनोद चव्हाण यांनी दिली.