30.4 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » केंट वेली इंटरनॅशनल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण
महाराष्ट्र

केंट वेली इंटरनॅशनल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण

उत्तम शिक्षणासोबत निरोगी विद्यार्थी हेच आमचे कर्तव्य…बिल.एन.पवार कॉलेज टिटवाळा
प्रमोद कुमार
टिटवाळा :- शारदा फाउंडेशन संचालित केंट वेली इंटरनॅशनल स्कूल आणि बि.एन. पवार ज्युनियर कॉलेज टिटवाळा येथे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 15 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना कोव्हॅक्शिन मात्रा पालकांच्या उपस्थितीत देण्यात आली.

कल्याण तालुक्यामध्ये टिटवाळा ग्रामीण भागात शारदा फाउंडेशन संचालित केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल आणि बि. एन. पवार ज्युनियर कॉलेज येथे मान्यताप्राप्त सी बी एस सी, स्टेट आणि आय सी एस सी बोर्ड माध्यमातून उच्च प्रतीचे शिक्षण दिले जाते म्हणूनच अगदी नव्याने सुरू झालेल्या या शाळा-महाविद्यालयात अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या सुंदर भवितव्याचा विचार करून प्रवेश घेतला आहे , गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा कॉलेज अनेक दिवस बंद ठेवावी लागली तरीही शालेय प्रशासनाच्या माध्यमातून उच्च दर्जाचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरु आहेच अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शाळा कॉलेज चालू होण्याची चिन्हे दिसत असताना कोरोना महामारी ओमायक्रोनसारखा नवा आजार पसरत असल्यामुळे शाळा प्रशासनाला नव्याने शासनाचे निर्बंध घालून द्यावे लागत आहेत. याच बरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशान्वये शाळा महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेल्या 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना कोव्हॅक्शिन मात्रा शाळेय प्रशासनाच्या माध्यमातून सरकारी आरोग्य विभागाच्या मार्फत मोफत देण्यात येत आहे. यामुळे आपल्या शालेय विद्यार्थ्यांची काळजी घेणे आपले परम कर्तव्य आहे याला अनुसरून शालेय प्रशासनाने प्रत्येक विद्यार्थी यांना पालकांच्या उपस्थितीत शासनाच्या नियमानुसार १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्शिन मात्रा देण्यास सुरुवात केली .

या शाळा-महाविद्यालयात जवळ जवळ सोळाशे विद्यार्थी विद्यार्थिनी सी बी एस सी , स्टेट आणि आयसीएससी बोर्डाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत यामध्ये 16 ते 18 वयोगटातील जवळ जवळ 250 विद्यार्थ्यांना कोव्हॅक्शिन मात्रा जसजशी उपलब्ध होईल त्याप्रमाणे देण्यात येईल असे शालेय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Related posts

वासींद येथे पदयात्रा करून जनजागरण अभियानाचा समारोप

Bundeli Khabar

जागतिक स्वच्छता दिनानिमित्त ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेची भव्य स्वच्छता मोहीम

Bundeli Khabar

कस्तूरबा हॉस्पिटल में गैस लीक का मामला आया सामने

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!