27.9 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » रायगड जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा २०२२
खेल

रायगड जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा २०२२

रायगड (गुरुदत्त वाकदेकर) : द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यातर्फे २१वा युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात मैदानी स्पर्धांसोबतच साहित्यालाही विशेष स्थान देण्यात आले आहे. यंदाही रायगड जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर काव्य स्पर्धा रविवार दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी सायंकाळी ठीक ४:३० वाजता बोकडवीरा गाव, एन्. एम्. एस्. ई. झेड. मैदान, पेट्रोल पंपाजवळ, ता. उरण, जि. रायगड येथे होणार आहे, अशी माहिती द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, सचिव दिलीप तांडेल, स्पर्धा प्रमुख/सूत्रसंचालक अरुण द. म्हात्रे, संयोजक/निवेदक संजय होळकर, रमणिक म्हात्रे, भ. पो. म्हात्रे यांनी कळवली आहे.

काव्य स्पर्धेच्या नियम व अटी:-
रायगड जिल्ह्यातील कवींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा नि:शुल्क आहे. काव्यस्पर्धेचे विषय- आजी किंवा आजोबा, शेतकरी आणि पोलिस असे आहेत. कविता मराठी भाषेतच, स्वरचित आणि सकारात्मक असावी. कोणत्याही प्रकारचे अश्लील/अर्वाच्य शब्द वापरू नयेत. सामाजिक/ राजकीय तेढ निर्माण करणार्‍या तसेच कुणाचेही मन दुखावणार्‍या रचना नकोत. सादरीकरणासाठी वेळ फक्त तीन मिनिटे. परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील. कार्यक्रमात फेरबदल करण्याचे अधिकार आयोजकांनी अबाधित ठेवले आहेत. सूचना-नियम पाळावेत. स्पर्धेचा निकाल तसेच बक्षिसे आणि प्रमाणपत्र स्पर्धेच्या ठिकाणी लगेचच देण्यात येतील. दिनांक १ जानेवारी २०२२ पर्यंत नाव नोंदणी संजय सर 8433696965 रमाणिक सर 9870948841 ह्या व्हाॅट्सअॅप क्रमांकांवर करावी. स्पर्धकांनी स्वखर्चाने येणे-जाणे करायचे आहे. सदर स्पर्धा कोविड-१९ च्या सर्व नियमाचे (मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स व दोन डोस घेतलेल्या व्यक्ती) पालन करून करण्यात येणार आहे.

पारितोषिकं:-
प्रथम क्रमांक रोख रू. १५००/- द्वितीय रू. १३००/- तृतीय रू. ११००/- चतुर्थ रू. ९००/- तसेच उत्तेजनार्थ प्रथम रू.६००/- द्वितीय- रु. ५००/- तृतीय- रू. ४००/- चतुर्थ- रू. ३००/- अशी एकूण आठ बक्षिसे काढण्यात येतील.

Related posts

भारताचा झिम्बांब्वेवर ५ गडी राखून विजय

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – अटीतटीच्या सामन्यात लखनौ विजयी

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – बेंगळुरू ८ गडी राखून विजयी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!