30.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » एंजेल वनची सबस्क्रिप्शन आधारित स्मॉलकेस सेवा
व्यापार

एंजेल वनची सबस्क्रिप्शन आधारित स्मॉलकेस सेवा

संतोष साहू/महाराष्ट्र,

मुंबई: आपल्या ग्राहकांना एक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी सक्षम बनविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून गुंतवणुकीशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा पुरविणारी कंपनी एंजेल वन लिमिटेडने (आधीचे नाव एंजेल ब्रोकिंग लिमिटेड) आपल्या मंचावर सबस्क्रिप्शन आधारित स्मॉलकेसेस उपलब्ध करून देण्यासाठी अनेक अग्रगण्य रीसर्च अॅनालिस्ट आणि गुंतवणूक सल्लागारांशी सहयोग साधल्याची घोषणा केली आहे.

या भागीदारीमुळे यूजर्सना भारताच्या सुप्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सनी सांगितलेल्या नाविन्यपूर्ण धोरणांचा वापर करून इक्विटी आणि ईटीएफ पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. एंजेल वनच्या क्लाएंट्सना अबॅकस, ग्रीन पोर्टफोलिओ, कॅपिटलमाइंड, तेजीमंदी, राइट रीसर्च, विंडमिल कॅपिटल, वीकेंड इन्व्हेस्टिंग आणि ऑरम कॅपिटल यांसारख्या सेबीकडे नोंदणीकृत अॅनालिस्ट्सनी खास निवडलेले इक्विटींचे पर्याय आजमावून बघता येणार आहेत. पोर्टफोलिओंची ही शिफारस संख्यात्मक विश्लेषणाचा समावेश असलेले क्वान्टामेंटल फ्रेमवर्क, वाढ, दर्जा, लाभांश, फॅक्टर इन्व्हेस्टिंग, विशिष्ट मालमत्तांमध्ये गुंतवणूकीस भर देणारे फॅक्टर इन्व्हेस्टिंग, संख्यात्मकता, संवेग इत्यादी निकषांनुसार केली जाईल.

एंजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी म्हणाले, “एंजेल वनमध्ये आम्ही गुंतवणूकदारांना तंत्रज्ञानाच्या आधारे चालणा-या प्रक्रिया, संसाधने आणि मंच यांचा संच पुरवून त्यांची गुंतवणुकीच्या क्षेत्रातील वाटचाल सुकर करण्यामध्ये विश्वास ठेवतो. नव्या स्मॉलकेस सेवांमुळे आमच्या ग्राहकांना आपल्या गुंतवणुकीमधून अधिकाधिक परतावा मिळवता येईल. त्यांना स्टॉक्स/ईटीएफच्या विविध गटांतून योग्य मार्ग शोधता येईल आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीच्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणता येईल.“

एंजेल वन लिमिटेडचे चीफ एक्झेक्युटिव्ह ऑफिसर नारायण गंगाधर म्हणाले, “एंजेल वनमध्‍ये आम्ही नेहमीच आमच्या गुंतवणुकदारांना तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत उपाययोजना देऊ करत अधिकाधिक परतावा मिळविण्यास सक्षम बनविले आहे. हाच परिणाम साधण्यास मदत करण्यासाठी आम्ही आमच्या मंचावर आणखी स्मॉलकेसेसची भर टाकली आहे. आता त्यांना अधिक पर्यायांचा धांडोळा घेता येईल आणि स्वत:साठी सर्वात सुयोग्य ठरणारे गुंतवणूक धोरण स्वीकारता येईल.“

Related posts

नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात जोषात

Bundeli Khabar

अस्थिरतेच्या दरम्यान किरकोळ नफा

Bundeli Khabar

मिवी ने लॉन्च किया डुओपॉड्स एफ40

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!