22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » घरफोडी जबरी चोरी प्रकरणात फरार असलेला आरोपी टिटवाळा पोलिसांच्या जाळ्यात
महाराष्ट्र

घरफोडी जबरी चोरी प्रकरणात फरार असलेला आरोपी टिटवाळा पोलिसांच्या जाळ्यात

तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाची उत्कृष्ट कामगिरी.
प्रतिनिधी / संदीप शेंडगे

टिटवाळा – : तब्बल ४८ गुन्हे दाखल असलेला तसेच अनेक वर्षापासून फरार असलेल्या नामचीन चोरट्यास टिटवाळा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी मुंबईतील रेड एरिया कामाठीपुरा येथून मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.

गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या तीन राज्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी दरोडा चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. अनेक गुन्ह्यात घरात असलेला सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने आता अनेक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करता येणार असल्याचे तालुका पोलिसांनी सांगितले.
रोहिदास केरकर उर्फ गावडे (वय ३५) असे नाव असलेल्या या चोरट्यावर चैन स्नॅचिंग सारखे अनेक गुन्हे नोंद असून असून तो नॉर्थ गोवा पणजी येथे राहत होता. नियमित आपली राहण्याची जागा बदलत असल्याने तसेच झोपडपट्टी व रेड एरिया मध्ये राहत असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तेरा वर्षापासून अनेक स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्यातील पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र गुन्हा केल्यानंतर आपली राहण्याची जागा तो सतत बदलत असल्याने तो सहजासहजी पोलिसांच्या जाळ्यात सापडत नव्हता. गोवा, पणजी, म्हापुसा, कलंगुट , परवरी, बिलोचीम, परनेम, पोंडा, लांजा या राज्यात त्याच्यावर चैन स्नॅचिंगचे २५ गुन्हे दाखल असून कर्नाटक राज्यात हुबळी व धारवड तसेच महाराष्ट्रातील ठाणे येथील शिवाजीनगर, कापूरबावडी, वर्तकनगर, वागळे इस्टेट, कल्याणातील महात्मा फुले चौक, खडकपाडा, उल्हासनगर तसेच टिटवाळा कल्याण तालुका पोलिस ठाण्यात चैन स्नॅचिंग प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पोलिसांनी अनेकदा सापळे व पाळत ठेवून चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. मात्र पोलिसांना गुंगारा देऊन तो पळून जाण्यास यशस्वी होत होता. सोमवारी टिटवाळा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांना मुंबईतील कामाठीपुरा परिसरात रोहिदास केरकर आला असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून मिळताच या माहिती आधारे अत्यंत गुप्तपणे तपास करून सगळीकडे नाकाबंदी करून संपूर्ण एरियाला घेराव घालून मोठ्या शिताफीने त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्मिता पाटील, उपाधिक्षक नाईक तसेच टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस पोलिस निरिक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे, पोलीस हवालदार तुषार पाटील, दर्शन सावळे, नितीन विशे, योगेश वाघेरे यांनी ४८ गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या अखेर मुसक्या आवळल्या. टिटवाळा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्मिता पाटील, उपाधिक्षक नाईक यांनी टिटवाळा पोलिसांच्या या कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले आहे.

Related posts

नवाब मलिकांच्या पाठिशी राष्ट्रवादी ठाम

Bundeli Khabar

संकल्पचा बाल मेळावा मोठ्या उत्साहात

Bundeli Khabar

संकट संपलेलं नाही

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!