मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कोरोनाच्या दोन वर्षाच्या वास्तव्यानंतर यंदाची दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्याची तयारी अवघ्या देशाने केली आहे. सर्व बाजारपेठा खरेदी दाराच्या गर्दीने फुलून निघाल्या आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी, झोपडपट्टी, ग्रामीण, दलित भागात शैक्षणिक कार्य करणारे रमेश खानविलकर मात्र दरवर्षी दिवाळीचा पहिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करतात. जेव्हा सर्व लोक दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात आपल्या मुलांबाळांत असतात. त्यावेळी रमेश खानविलकर आदिवासी पाड्या- पाड्यातून प्रत्येक झोपडीत दिवाळीचा ‘फराळ’ वाटत असतात. आदिवासी कामगार, इमारत बांधकाम मजूर, झोपडपट्टीतील मुलांना “नवीन कपडे” वाटप करत असतात.शिक्षण तज्ञ रमेश खानविलकर यांच्या जीवनावर “वादळवाट” नावाचे पुस्तक डॉ. विजया वाड यांनी लिहिले असून त्याची प्रथम आवृत्ती संपली सर्व वाचक दुसऱ्या आवृत्तीची वाट वाट पाहत आहेत.
कर्जत, खोपोली, माणगाव, पोलादपूर, महाड येथील आदिवासी पाड्यात ३५० मुलांना रमेश खानविलकर यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवीन कपड्यांचे वाटप केले व प्रत्येक झोपडीतील वयोवृद्धांना मिठाई दिली त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून होते. याबाबत रमेश खानविलकर म्हणाले की आम्ही दरवर्षी दिवाळीचा पहिला दिवस असाच साजरा करतो. त्यामुळे आत्मिक समाधान लाभते व माझीही एकेकाळची दिवाळी घरात कोरा चहा बटर खाऊन झाली होती. ती आठवण मनात सतत येते. त्यामुळे दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही खानविलकर कुटुंबीय आदिवासी पाड्यात मिठाईचे वाटप करत असतो.
Home » सारी दिवाळी” विसावली या झोपडीत माझ्या – शिक्षणतज्ञ रमेश खानविलकर

