39.8 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » ज्युडोच्या उत्तम भविष्यासाठी आयआयएस आणि जेएफआय यांच्यात करार
महाराष्ट्र

ज्युडोच्या उत्तम भविष्यासाठी आयआयएस आणि जेएफआय यांच्यात करार

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट (आयआयएस) आणि ज्युडो फेडरेशन ऑफ इंडिया (जेएफआय) यांनी एका करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली. ज्यामुळे दोन्ही संस्था सुरुवातीच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी अधिकृत उच्च भागीदार बनतील.
कराराच्या अटींनुसार, आयआयएस बेल्लारी, कर्नाटक येथील त्यांच्या अत्याधुनिक कॅम्पसमध्ये प्रवेश प्रदान करेल आणि कनिष्ठ आणि उच्चभ्रू भारतीय ज्युडोकांसाठी क्रीडा विज्ञान कौशल्य उपलब्ध करून देईल, तसेच भारतीय संघांचे येथे आयोजन करेल. राष्ट्रीय शिबिरांसाठी सुविधा तसेच संपूर्ण शिष्यवृत्तीवर ज्युडो कार्यक्रमात समाविष्ट करणार्‍या देशभरातील प्रतिभावान जुडोकांना ओळखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी संस्था एकत्र काम करेल.
करारावर स्वाक्षरी आणि कागदपत्र हस्तांतराच्या वेळी बोलताना, इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टचे संस्थापक पार्थ जिंदाल म्हणाले, “गेल्या काही वर्षांत आयआयएस ज्युडो कार्यक्रमाने प्रचंड यश मिळवले आहे, ज्यामुळे आम्हाला अंतर्भूत प्रतिभा आणि क्षमतांबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ज्युडो हा एक लोकप्रिय जागतिक खेळ आहे आणि आम्ही भारतातील खेळासाठी इकोसिस्टम विकसित आणि व्यावसायिक करण्यासाठी जेएफआयसोबत काम करण्यास वचनबद्ध आहोत.
प्रताप सिंग बाजवा, संसद सदस्य आणि अध्यक्ष ज्युडो फेडरेशन ऑफ इंडिया म्हणाले, “जेएफआयसाठी उच्च कार्यप्रदर्शन भागीदार म्हणून आयआयएस बोर्डात आल्याने आम्हांला खूप आनंद झाला आहे. ज्युडो या खेळाला भारतामध्ये एक उज्ज्वल भविष्य आहे. ज्याला भारतीय सरकारने प्राधान्य खेळ म्हणून मान्यता दिली आहे. आयआयएससारख्या संस्थेसोबतच्या भागीदारीने आम्ही भारतातील खेळाच्या विकासाबद्दल आशावादी आहोत.
जॉर्जियन मुख्य प्रशिक्षक मामुका किझिलाश्विली आणि द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त जीवन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील ज्युडो कार्यक्रमाने २०१७ पासून ७० हून अधिक जुडोका तयार केले आहेत. ज्यांनी राष्ट्रीय, महाद्वीपीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर १०१ पदके मिळवली आहेत. २०१८ मध्ये अर्जेंटिना येथे झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी थंगजम तबाबी देवी देखील संस्थेचे प्रतिनिधीत्व करतात. टोकियो २०२० मधील भारताच्या एकमेव जुडोका सुशीला देवी यांच्यासह अलीकडील इव्हेंटमध्ये संस्थेने टीम इंडियाच्या बहुतेक ज्युडोकांचे योगदान दिले आहे.

Related posts

कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी नियम पाळावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Bundeli Khabar

समाज के विशिष्ट लोग नेल्सन मंडेला नोबल पीस अवार्ड एकेडमी द्वारा डॉक्टरेट की उपाधि से सम्मानित

Bundeli Khabar

या रहिवाशांना असे वाऱ्यावर सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत यातून मार्ग काढणे गरजेचे:खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!