29.1 C
Madhya Pradesh
October 18, 2024
Bundeli Khabar
Home » उंबरवाडी येथे आदिवासी बांधवाना फराळ साहित्याचे वाटप
महाराष्ट्र

उंबरवाडी येथे आदिवासी बांधवाना फराळ साहित्याचे वाटप

दयानंद चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

किशोर पाटील/महाराष्ट्र
शहापूर : ठाणे जिल्ह्यात विविध पक्षात अनेक नेते असले तरी स्वतःचे दुःख बाजूला सारून गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा व त्यांचे अश्रू पुसणारा नेता म्हणजे दयानंद चोरघे म्हणूम काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करत आहेत असे प्रतिपादन शहापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष तथा माजी उपसभापती महेश धानके यांनी उंबरवाडी येथे केले.
काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद दादा चोरघे यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर तालुका काँग्रेस तर्फे मांजरे जिल्हा परिषद गटात उंबरवाडी येथे आदिवासी बांधवाना फराळ साहित्याचे
(रवा,मैदा,साखर,डालडा)
तसेच लहान मुलांसाठी बिस्कीट-चॉकलेट खाऊचे
वाटप करण्यात आले
या कार्यक्रमा प्रसंगी तालुकाध्यक्ष महेश धानके बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण घरत साहेब, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अंकुश भोईर,डी.वाय. फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष देवेन भेरे ,महिला तालुकाध्यक्ष संध्याताई पाटेकर,अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष अब्दुल शेख, आंबो खंडवी,राम वाघ, शरद विशे, चंद्रकांत सर,सिद्धार्थ धानके आदी उपस्थित होते.लक्ष्मण घरत व देवेन्द्र भेरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय अध्यक्ष महेंद्र आरज,ज्ञानेश्वर धानके, वाळकू पोकळा,भगवान पोकळा, यांनी विशेष मेहनत घेतली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर धानके यांनी तर आभार प्रदर्शन संध्याताई पाटेकर यांनी मानले.

Related posts

नोव्हेंबर अखेरपर्यंत भिवंडीत कोरोना लसीचा पहिला डोस पूर्ण करणार, नागरिकांनी सहकार्य करावे : आयुक्त सुधाकर देशमुख

Bundeli Khabar

कोयते से वार करने वाले आरोपी को पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar

कल्याण पूर्व में शिवसेना की महिला पदाधिकारी राष्ट्र कल्याण पार्टी में शामिल

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!