30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20211023 WA0010
महाराष्ट्र

एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर कालवार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रमोद म्हात्रे यांची बिनविरोध निवड

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील मौजे कालवार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक शासनाच्या नियमानुसार सदर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाची निवडणूक जनतेमधून झाली होती मात्र शिवसेना-भाजपा यांच्या आपसात ठरल्याप्रमाणे अडीच अडीच वर्षाचा फार्मूला ठरल्याप्रमाणे विद्यमान सरपंच श्री देवानंद पाटील यांनी अडीच वर्षानंतर आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर काही कारणास्तव शासनाच्या आदेशात बदल करण्यात आला त्यामुळे जनतेतून सरपंच न होता निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवडला गेला पाहिजे असे आदेश पारित करण्यात आले. व १९/११/२०२० रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या दिवशी सरपंच कोण होणार असे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी देण्यापूर्वी त्यांना फोन आला.की या निवडणूक
प्रक्रिये विरोधात उच्च न्यायालयात अड् श्री. महेश म्हात्रे यांनी याचिका दाखल केली त्यामुळे सदर निवडणूक रद्दबातल करण्यात आली. व
या एक वर्षाच्या कालामध्ये कोणत्याही प्रकारचा निकाल न लागल्यामुळे श्री महेश म्हात्रे यांनी दाखल केलेली याचिका माघार घेतल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने सदर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश पारित केले.व ते पारित करताच शुक्रवार दिनांक २२/१०/२०२१ रोजी अध्यासी अधिकारी तथा पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री राजू भगवान भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक श्री निलेश म्हात्रे, उपसरपंच विनया विद्यानंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल भास्कर म्हात्रे, दिपाली गणेश म्हात्रे, हरिचंद्र काशिनाथ म्हात्रे, पंडित बाळाराम पाटील ,मोहिनी गिरीश म्हात्रे,व माधुरी गणेश पाटील यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय प्रक्रिया सर्वांच्या समोर लिफाफा उघडून नाव जाहीर करण्यात आले सदर लिफाफ्या मध्ये
श्री प्रमोद यशवंत म्हात्रे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र असल्याने त्यांची कालवार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी श्री राजू भोसले यांनी जाहीर करताच त्यांच्या समर्थकांनी समस्थ ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत नवनिर्वाचित सरपंच श्री प्रमोद म्हात्रे यांचे जंगी स्वागत केले.
यावेली गावातील ग्रामस्थ गुरुनाथ .स .म्हात्रे, विनोद म्हात्रे, काथोड म्हात्रे ,देवानंद पाटील, रामदास म्हात्रे, देवानंद म्हात्रे ,मोरेश्वर म्हात्रे, विजय म्हात्रे, मधुकर म्हात्रे , प्रमोद म्हात्रे , विजय द्वारकानाथ म्हात्रे, महेंद्र म्हात्रे , प्रदीप म्हात्रे प्रकाश (बारक्या) म्हात्रे, आदी मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते,
त्यांचे अभिनंदन करण्यासाठी श्री पी के म्हात्रे यांनी आपली उपस्थिती दाखविली.
आज मी संपूर्ण गावाच्या सहकार्यामुळे सरपंच पदी विराजमान झालो आहे त्यामुळे मी गावातील सर्व ग्रामस्थांचे ज्येष्ठ नागरिकांचे व लहान थोर तरुण वर्गाचे मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळात गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेन असे यावेळी नवनिर्वाचित सरपंच श्री प्रमोद यशवंत म्हात्रे यांनी बोलताना सांगितले.


Bundelikhabar

Related posts

नोशन प्रेस मराठी पुस्तक प्रकाशन व्यवसायात करणार पदार्पण

Bundeli Khabar

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे घवघवीत यश

Bundeli Khabar

ग्रंथपालन परीक्षेच्या फेर गुणमोजणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Bundeli Khabar
error: Content is protected !!