24.4 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20211023 WA0012
महाराष्ट्र

मा.सभापती दर्शना करसन ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर तथा के.आर.मालदे इंग्लिश मिडियम स्कुलचे उद्घाट‌न

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : माऊली ग्रुप रांजनोली नाका व संकल्प ब्लड बँक कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद ठाणे मा. सभापती दर्शनाताई करसन ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच के.आर.मालदे इंग्लिश मिडीयम स्कुलचे उद्घाटन देखील पार पडले.नागरिकांसाठी मोफत कोरोना प्रतिबंध लसीकरण देखील करण्यात आले. दर्शना ठाकरे या संस्थेच्या संचालिका आहेत आणि त्यांचे वाढदिवसानिमित्त संस्थेने नवीन शैक्षणिक वास्तु बनवली आहे.हि वास्तु विद्यार्थ्यांसाठी सुरु करून आपल्या परिसरात शिक्षणापासुन वंचिय राहणा-या मुलांना मोफत शिक्षण देण्याचे काम सुरु आहे.तसेच ज्यांचे वडील लहानपणीच वारले अशा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण संस्था देत असुन दत्तक घेते व त्यांच्या शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी संस्था स्विकारते अशी माहिती शिक्षण महर्षी करसन ठाकरे यांनी दिली.दरम्यान मा.सभापती यांना शुभेच्छा देण्यासाठी मा.सभापती सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे,सभापती नमिता निलेश गुरव,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश गुरव,शिवसेनेचे शाम चौधरी,हेंदर मामा,शिवसेना उपतालुका प्रमुख राकेश म्हात्रे,सरपंच विनोद भोईर,शरद भोईर,उमेश चोरघे,शरद पाटील,शशिकांत पाटील समवेत रांजणोली जि.प.गटातील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

राजकीय – प्रशासकीय अनास्थेमुळे स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना दुर्लक्षित

Bundeli Khabar

केंद्रीय मंत्री नारायण राणे के बयान को लेकर पूरे महाराष्ट्र में आंदोलन शुरू

Bundeli Khabar

प्रेस क्लब में ओमप्रकाश पांडेय लिखित ‘आँचल’ कविता संग्रह का लोकार्पण

Bundeli Khabar
error: Content is protected !!