21.8 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20211012 WA0008
महाराष्ट्र

आरोग्यदायी व दीर्घायुष्यासाठी व्यायाम करणे महत्त्वाचे:भवानजी आगे पाटील 

Bundelikhabar

नाणे येथे जेराई फिटनेस कंपनीच्या सौजन्याने व्यायामशाळेचे उद्याटन

किशोर पाटील/महाराष्ट्र
वाडा : स्वतःचे शरीर सदृढ व निरोगी बनवण्यासाठी नित्यक्रमाणे व्यायाम करणे आज महत्वाचे बनले असून तरूणांनी व्यायामावर भर द्यावा त्यामुळे आपल्याला आरोग्यदायी व दीर्घायुष्य लाभत असल्याचे प्रतिपादन वाड्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. भवानजी पाटील यांनी नाणे येथे बोलताना केले.
तालुक्यातील नाणे येथे जेराई फिटनेस कंपनीच्या सौजन्याने तयार केलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्याटन प्रसंगी ते बोलत होत। भवानजी पाटील पुढे म्हणाले की, मी माझ्या जीवनात अनेक कारखानदार पाहिले पण असे दातृत्व असलेले राजेश राय कारखानदार हे प्रथमच पाहिल्याचे गौरवोद्गार काढले. तरूणांनी त्यांच्या दातृत्वाचा फायदा घेऊन नियमित व्यायाम करून सैनिक,पोलिस, होमगार्ड या क्षेत्रात संधी निर्माण करून रोजगार मिळवावा असे आवाहनही पाटील यांनी केले. 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक सुधीर संख्ये यांनी तरूणांना आपला शरीर सौष्ठवाचा दुरूपयोग न करता गावाला कुटुंबाला त्याचा उपयोग कसा होईल हे पहावे असे स्पष्ट केले. 
 जेराई फिटनेस कंपनीचे मालक राजेश राय यांनी आपल्या प्रास्ताविकात चमकदार खेळाडू हे ग्रामीण भागातून येत असतात मात्र त्यांना अत्याधुनिक सेवा सुविधा मिळत नसतात म्हणून मी ग्रामीण भागातील खेळाडूना संधी मिळावी विभागवार व्यायामशाळा करण्याचे जाहीर करून या माध्यमातून खेळाडू घडविण्याचे प्रयत्न करीत आहे असे सांगितले. 
यावेळी तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेराई फिटनेस चे सहकारी व नाणे ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. 


Bundelikhabar

Related posts

कोणार्क एक्सप्रेस में छापा मारकर लाखो रुपए मूल्य का मादक पदार्थ किया बरामद

Bundeli Khabar

नरेश जाधव यांच्या प्रयत्नातून खुपरी येथे सेवा स्वभाग्य ट्रस्ट च्या वतीने रेशनकीट व मुलांना खाऊच वाटप

Bundeli Khabar

शातिर चोर को डोंबिवली पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar
error: Content is protected !!