27.1 C
Madhya Pradesh
October 18, 2026
Bundeli Khabar
IMG 20211007 WA00212
मनोरंजन

राष्ट्रीय स्तर नृत्य स्पर्धेत ध्रुवी राजेश वाघमारे प्रथम क्रमांकाने विजयी

Bundelikhabar

ब्यूरो/महाराष्ट्र
मुंबई : क्रीएटिव्ह माईंड प्रस्तुत माय प्रीस्कूल रायझींग स्टार शिर्षकाने राष्ट्रीय स्तरावर गायन व नृत्य स्पर्धा भरवण्यात आली होती. १२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत स्पर्धेत नाव नोंदणी व गायन व नृत्य चित्रफीत देण्याचा कालावधी होता.स्पर्धेचा निकाल ५ सप्टेंबर ला जाहीर होणार होता.
मोठा शिशु वर्ग(SR.KG) गटात नृत्य स्पर्धेत कु.ध्रुवी राजेश वाघमारे प्रथम क्रमांक मिळवुन विजय प्राप्त केला.तर दुसरा क्रमांक तेलंगणा राज्यातील निझामाबाद येथील श्रीष्टी मोदानी तर तृतीय क्रमांक नवी मुंबई,घणसोली येथील मिनाती पाटील यांनी पटकावला.

जोगवा चित्रपटातील लल्लाटी भंडार या प्रसिद्ध गाण्यावर ध्रुवीने नृत्य सादरीकरण केले.या स्पर्धेत देशभरातुन सुमारे ४५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. हिंदी,मराठी चित्रपट सिने अभिनेते अतुल परचुरे यांच्या पत्नी,क्लासिकल डान्सर व कोरिओग्राफर सौ.सोनिया परचुरे तसेच संगीत निर्देशक व चित्रपट निर्माते मा.गुलजार सिंग हे या स्पर्धेचे परीक्षक होते.
लवकरच कु.ध्रुवीस मराठी टीव्ही सिरीयल आणि चित्रपटात नृत्य सादरीकरणाची संधी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे परीक्षक सौ.परचुरे व गुलजार सिंग यांनी सांगितले.


Bundelikhabar

Related posts

शक्ति रत्न पुरस्कार 2022 से सम्मानित हुए समाज के विशिष्ट लोग

Bundeli Khabar

अप्लॉज एंटरटेनमेंट, एलिप्सिस एंटरटेनमेंट और मिसेज फनीबोन्स मूवीज मिलकर बनाएंगे फिल्म

Bundeli Khabar

अभिनेत्री अनिता हसनंदानी ने आगामी डांस रियलिटी शो – इंडियाज़ बेस्ट डांसर – 2 को लेकर जाहिर किया अपना उत्साह

Bundeli Khabar
error: Content is protected !!