22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक प्रश्न सुटावेत म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे यांची रायगडमध्ये विविध कार्यालयांना धडक
महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक प्रश्न सुटावेत म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे यांची रायगडमध्ये विविध कार्यालयांना धडक

मनिलाल शिंपी/महाराष्ट्र
ठाणे : रायगड जिल्ह्यातील शाळांचे शैक्षणिक प्रश्न सुटावेत म्हणून शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो .अभ्यंकर यांच्या आदेशान्वये , महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे नेतृत्वाखाली आज रायगड जिल्हााधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले ,तसेच शिक्षणाधिकारी श्रीमती ज्योती शिंदे , पे युनिट अधीक्षक कार्यालय, लेखाधिकारी कार्यालय या ठिकाणी भेटी देऊन शाळांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.
१) रायगड जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून व्हावे म्हणून निवासी जिल्हाधिकारी यांना भेट देऊन निवेदन दिले तसेच तातडीने पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून झालीच पाहिजेत अशी मागणी केली पगार राष्ट्रीयीकृत बँकातूनच होतात या अशीही माहिती निवासी जिल्हाधिकारी मॅडम यांनी मान्य केले. सहकार्य करण्याचे आश्वासित केले , मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले .
२) वरिष्ठ वेतनश्रेणी निवडश्रेणी यादी त्वरित जाहीर करणे – १५ दिवसांत याद्या जाहीर होतील असे त्यांनी सांगितले
३) अनुकंपा तत्त्वावरील मान्यता
४) वीना अनुदानावरून अनुदानावर बदली
५) सेवानिवृत्त लोकांच्या पेन्शन केस व फायनल पेमेंट बिलावर सह्या करणे
६) आरटीई पुनर्मान्यता
७) मुख्याध्यापकांना मार्गदर्शनपर सभा लावणे
८) कार्यालयात आलेल्या मुख्याध्यापक- शिक्षकांना सन्मानाने वर्तणूक देणे
९) शैक्षणिक कामांकरिता सादर केलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्यास एकदाच त्रुटी काढून शाळेस कळवणे , वारंवार त्रुटी काढू नयेत
१०) अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता
११) शालार्थ प्रणालीमध्ये नावनोंदणी करण्यासाठी कार्यालयात आलेल्या फाइल शिफारशीसह उपसंचालक कार्यालयात त्वरित पाठविणे
१२) रोस्टर तपासणी त्वरित करून मिळावी
१३) विनाअनुदानित शाळांचे मूल्यांकन कराचे प्रस्ताव प्रलंबित असल्यास शिफारशींसह शासनास पाठवावे
१४) प्रलंबित संचमान्यता दुरुस्त करून मिळाव्यात.तसेच पे युनिट कार्यालयालाही भेट देऊन

१) जुनी पेंशन योजना कर्मचा-यांची माहीती शासनास तात्काळ पाठवण्यात यावी.
२) सेवानिवृत्त कर्मचार्यांचे फायनल पेमेंट त्वरित मिळावे
३) पीएफ ना परतावा मिळावा
४) पीएफच्या स्मिता मिळविण्यासाठी कॅम्प लावावा – लवकरच कॅम्प लागणार असून सर्वांना स्लिपा मिळतील.
त्यासाठी विशेष लिंक तयार करून माहिती मागवली जाणार आहे
५) सातवा वेतन आयोगचे हप्ते मिळावेत
६) दरमहा पगार बिले वेळेत करावीत
७) काही वैयक्तिक शाळांचे प्रश्न होते तेही तातडीने मार्गी लावले

लेखाधिकारी यांना भेट देऊन खाली प्रश्नांवर चर्चा केली

१) वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र असलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना स्टॅम्पिंग करून मिळणे
२) ऑडिट तपासण्याकरता शाळांच्या मागणीनुसार कॅम्प लावणे व अन्य वैयक्तिक विषयांवर चर्चा करून ते विषय तातडीने सोडविन्यात् आले.
या वेळी मुख्याध्यापक संघ मुंबई विभागाचे सचिव श्री लखीचंद ठाकरे , रायगड जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री रवींद्रनाथ पाटील , उर्दू शिक्षक सेनेचे समन्वयक श्री फरिदुल काझी, जुनी पेंशन हक्क संघटनेचे अध्यक्ष श्री गजानन म्हात्रे, माणगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री पारकर , उपाध्यक्ष श्री पवार , सचिव श्री. कुशिरे , श्री कांबळे ,पेण तालुका अध्यक्ष श्री सुरेश मोकल, माणगाव शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत अधिकारी , रोहा तालुका अध्यक्ष श्री संजय गायकवाड सर , श्री राजन पाटील, श्री.प्रकाश भोईर, श्री.अरुण पाटोळे आदी मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

सौ करोड़ का मानहानि का दावा

Bundeli Khabar

राष्ट्रीय मानव अधिकार अपराध एवम् भ्रष्टाचार विरोधी ब्यूरो” की मनाई गई तीसरी वर्षगाँठ

Bundeli Khabar

सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबीर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!