21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » कचऱ्या मुळे रोगांना आमंत्रण नागरिक त्रस्त मात्र पालिका प्रशासन अधिकाऱ्यांचा काना डोळा
महाराष्ट्र

कचऱ्या मुळे रोगांना आमंत्रण नागरिक त्रस्त मात्र पालिका प्रशासन अधिकाऱ्यांचा काना डोळा

ब्युरो/महाराष्ट्र
टिटवाला : सध्या कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात पेटला असुन त्यावर एक छोटेसे मनोगत…
कचरा न उचलणे भोवले हि बातमी म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाप झाकण्याचे प्रकार आहेत अस मला वाटत आणि मी हे काहि सहज नाहि बोलत तर त्याला पण कारण आहेत.
अधिकारीवर्गाने कधी हा विचार केलाय का कि कर्मचारी कचरा का उचलत नाहि अरे प्रत्येक वार्डात लोकसंख्या किती त्यासाठी कर्मचारीवर्ग किती त्या कर्मचाऱ्यांना साधनसामग्री किती ह्याचा कधी विचार केलाय का ?
विजय(भाऊ) मारुती देशेकर राहणार मांडा टिटवाळा
अध्यक्ष-टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशन ज्या कोणा वरीष्ठ अधिकाऱ्यांनी नोटीसा काढल्यात त्या अधिकाऱ्यांना मला पडलेले साधेसरळ प्रश्न मांडतो व चुकीचे असेल तर खुलासा देखील द्यावा.
केडीएमसी परीसरात उघड्यावर पडणारा कचरा गोळा करण्यासाठी ज्या कचराकुंड्या हटवुन कचराकुंडीमुक्त शहर करुन काय साध्य केल…. उलट कचराकुंड्या हटवल्याने आता कचरा रस्त्यावर पडुन पसरला जातो तसेच भटके जनावरे ते खातात त्यामुळे दुर्गंधी पसरते व जनावरे देखील आजारी पडत आहेत.
केडीएमसी परीसरात उघड्यावर पडणारा कचरा गोळा करताना कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळ केला जातो कारण कचरा गोळा करताना त्यांना कोणत्याही साधनसामग्री दिली जात नाहि तसेच त्या कचऱ्यात डायपर,सॅनिटरी पॅड,पेशंटचे डायपर,निरोध किंवा अजुन काहि अतीघातक कचरा हाताने गोळा करुन वर्गीकरण करण्यास भाग पाडले जाते त्यावर अधिकारी का मुग गिळुन बसले आहेत.वास्तविक शासनाच्या नियमानुसार हाताने कचरा सफाई करण्यास मनाई असुन त्याबाबत आदेश देखील पारीत असल्याची माहिती मिळत आहे.
कचरा वर्गीकरण सर्वच मनपा मध्ये केले जाते परंतु उघड्यावर पडणारा कचरा सर्व मनपा आहे तसाच गोळा करुन अत्याधुनिक मशिनचा वापर करुन वेगळा केला जातो त्यामुळे रस्त्यावर पडलेला कचरा देखील त्वरीत उचलला जातो व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास देखील धोका पोहचत नाहि मग अशा अत्याधुनिक मशीनी केडीएमसी का कायमस्वरूपी विकत घेत नाहि.
सध्या केडीएमसी मध्ये जागोजागी कचरा का पडत आहे त्यावर अधिकाऱ्यांनी काय अभ्यास केला ह्यावर कोणी बोलेल का ?
कर्मचारी कचऱ्यासाठी ज्या गाड्या वापरतात त्या आरटीओ च्या नियमांनुसार योग्य आहेत का ?
कचरा साफसफाई करण्यासाठी कर्मचारी संख्या प्रत्येक वार्डात कधी वाढेल हे अधिकारी सांगु शकतील का ?
कचराकुंड्या काढुन काय फायदा झाला ह्याची माहिती पत्रकारवर्गाला देउन नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे त्यावर उत्तर देणार का ?
फक्त कचऱ्याकडेच लक्ष देउन आरोग्यविषयक महत्त्वाच्या असलेल्या इतत सुविधा त्यात जंतुनाशक,धुरफवारणी,साफसफाई मोहीम ह्याकडे लक्ष देणार कोण…
एक सहज गोष्ट जाणवली म्हणून लिहतो कि जंतुनाशक फवारणी करण्याचा छोटा ट्रॅक्टर जो साधारणपणे ३ लाखापर्यंत नविन मिळत असेल ते टॅक्ट्रर केडीएमसी घेउ शकत नाहि आणि त्या ट्रॅक्टरचे करोडोंचा टेंडर असेल ह्यामागे नक्की काय कारण असु शकत.
• कर्मचाऱ्यांना नोटीस देण्याऐवजी कचरा उचलण्यासाठी ३ शिफ्ट कराव्यात जेणेकरून काम करणे सुलभ होइल.
• कर्मचाऱ्यांना नोटीस देण्याऐवजी चांगली व नविन वाहने द्यावीत जेणेकरून ती वाहने रस्त्यावर बंद न पडता वेळ वाचेल.
• कर्मचाऱ्यांना नोटीस देण्याऐवजी कचराकुंड्या परत लावाव्यात अन्यथा घंटागाड्या वाढवुन प्रत्येक करदात्या नागरीकांच्या घरापर्यंत घंटागाडी पोहचेल अशी व्यवस्था करावी.
• कर्मचाऱ्यांना नोटीस देण्याऐवजी केडीएमसी प्रशासनाने जो नविन कर प्रति घरामागे लावला आहे त्यानुसार करदात्या नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.
• शेवटचा प्रश्न असा आहे कि कर्मचारीवर्गाला नोटीसा देण्याऐवजी त्या गोष्टीला वरीष्ठ का जबाबदार नाहीत ह्याचे देखील संशोधन करुन एक चांगली सुविधा निर्माण करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा व आधुनिक विचारसरणी अंमळात आणावी असे मला वाटते.
आपल्या कोणासही माझ्या पोस्टबद्दल काहि शंका असल्यास मला फोन करुन टिटवाळा येथे प्रत्यक्षात शंकेचे निराकरण करण्यास यावे मी कचऱ्याच्या बाबतीत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यास तयार आहे असे विजय भाऊ देशेकर म्हणाले.

Related posts

आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांना आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२१ प्रदान

Bundeli Khabar

“स्वामी” च्या नेत्रतपासणी शिबिरास उदंड प्रतिसाद

Bundeli Khabar

जूडो के बेहतर भविष्य के लिए आईआईएस और जेएफआई के बीच समझौता

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!