39.3 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » ठाण्याचे जेष्ट रंगवलीकार आणि आर्टिस्ट श्री. सुनील मोरे यांना ‘ कला सन्मान पुरस्कार ‘ जाहीर
महाराष्ट्र

ठाण्याचे जेष्ट रंगवलीकार आणि आर्टिस्ट श्री. सुनील मोरे यांना ‘ कला सन्मान पुरस्कार ‘ जाहीर

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : ठाण्यात गेली २० वर्षांपासून रांगोळी आणि आर्टिस्ट क्षेत्रात भरीव योगदान असलेले ठाण्याचे जेष्ट रंगवलीकार आणि आर्टिस्ट श्री. सुनील परशुराम मोरे यांना, आर्ट्स बिट्स फॉऊंडेशन च्या वतीनं यंदाचा आर्ट्स बिट्स महाराष्ट्र ” कला सन्मान पुरस्कार २०२१” हा नुकताच जाहीर झाला आहे. आर्ट बिटस् ही संस्था गेली वीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांसाठी अनेक उत्तम उपक्रम राबविले जातात.आर्ट्स बिट्स संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी कलाक्षेत्रात विशेष कार्य करण्याऱ्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करते आर्ट्स बिट्स महाराष्ट्र ” कला सन्मान पुरस्कार २०२१”हा सुनील मोरे याना जाहीर करण्यात आला असून सुनील मोरे यांनी रांगोळी आणि आर्टिस्ट क्षेत्रात विविध स्पर्धेत भाग घेऊन उत्तम कामगिरी केली आहे तसेच संस्कार भरती जाणीव चित्र रांगोळी मधून निरनिराळे लेखन करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न देखील त्यांनी कलेतून केला आहे यामध्ये त्यांनी वारली पैंटिंग, बाबासाहेब पुरंदरे ,धर्मवीर आनंद दिघेसाहेब देवेंद्र फडणवीस ह्याचे चित्र आणि रांगोळी देखील उत्तम प्रकारे सादरीकरण केले आहे त्यांनी चित्र रांगोळी मधून स्पर्धेत भाग घेऊन प्रथम , द्वितीय , तृतीय असे पुरस्कार प्राप्त केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यंदाचा कला सन्मान महाराष्ट्र पुरस्कार मिळाल्याने त्यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री. नितिन शिंदे, सचिव तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री. किशोर बलिराम पाटील यांनी अभिनदंन करून पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या वर विविध स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related posts

अनिता दत्तानि ‘मिस एंड मिसेज इंडिया 2022’ ब्यूटी कॉन्टेस्ट में गोल्डन क्लास विनर रहीं

Bundeli Khabar

अनुभव घेऊनच मराठी शाळांची सदिच्छादूत झाले – चिन्मयी सुमीत

Bundeli Khabar

दक्षिण एशिया के पत्रकारों का संगठन ‘सारा’ के राष्ट्रीय संयुक्त सचिव पद पर जीतु सोमपुरा की नियुक्ति

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!