22.7 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210930 WA0012
महाराष्ट्र

मुरबाड येथील जांभूर्डे गावी पोषण माह अभियानाचा सोहळा उत्साहात संपन्न

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
मुरबाड : ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या
माध्यमातून गुरुवार दी. ३०/०९/२०२१ रोजी मुरबाड तालुक्यातील महिला व बालविकास प्रकल्प एक व दोन यांच्या सयुक्त विद्यमाने जांभूर्डे गावात पोषण माह अभियानाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. या समारोप सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती च्या सभापती व सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.श्रेया श्रीकांत गायकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमात विविध आहारातील जीवनसत्त्वाची माहिती सांगण्यासाठी पोषण सरस ही संकल्पा राबविण्यात आली. तसेच मातांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी मुरबाड पंचायत समिती सभापती श्री. दिपक पवार,जिल्हापरिषद गटनेते श्री.उल्हासभाऊ बांगर , जिल्हापरिषद सदस्य सुभाष अप्पा घरत , जिल्हापरिषद सदस्य सौ. रंजनाताई उघडा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. संजय बागुल , उपसभापती धनकर मॅडम, पं.स.सदस्य सीमाताई घरत, स्वराताई चौधरी, गायकर मॅडम, सरपंच भोपी मॅडम, माजी सरपंच प्रकाश भोपी व ग्रा. पं. सदस्य व इतर मान्यवर, अंगणवाडी सेविका मदतनीस,महिला, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी लंगुटे मॅडम, देशमुख मॅडम व पर्यवेक्षिका, मदतनीस यांनी केले होते.


Bundelikhabar

Related posts

मॉन्टेरिया विलेज में मिलेगा परिवार को ‘द कबीला’ एक्सपीरियंस

Bundeli Khabar

नाविक कामगार संघटनेचा एकजूट दिन साजरा

Bundeli Khabar

ठाणे मनपा परिवहन ने अपनी तिजोरी में १३ लाख रुपए

Bundeli Khabar
error: Content is protected !!