29.6 C
Madhya Pradesh
July 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20210929 WA0031
महाराष्ट्र

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे आ. भास्कर जाधवांना निवेदन

Bundelikhabar

संभाजी मोरे/महाराष्ट्र
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका पंधरा गाव विभागातील धामणंद लोटे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन सदस्य अरुण जी चव्हाण यांनी 15 गावं,विभागातील, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत, मूलभूत व अत्यावश्यक वं विभागातील विकास कामे उदाहरणार्थ रस्ते,पाणी, साकव व व दरडी कोसळून, घरांच्या झालेल्या नुकसानीबाबत चर्चा करून, गंभीर समस्या सोडविण्यासाठी, कार्यसम्राट आमदार भास्करजी जाधव यांची भेट घडवून आणली. त्या वेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण जी चव्हाण,प.स. सदस्य कृष्णा लांबे, उपविभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण , पंधरा गाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वं शिक्षण महर्षी अनंतराव पालांडे, पंधरा गाव विभाग जनता सेवा संघ, ग्रामीणचे पदाधिकारी, कार्याध्यक्ष व माजी उपसभापती यशवंतराव (आप्पा ) पालांडे,* सरचिटणीस विष्णू कदम, माजी विभागप्रमुख,श्री. सखाराम पालांडे, सापिर्ली गावचे प्रभाकरराव पालांडे ,भास्करराव पालांडे,सुभाषराव पालांडे, माजी सरपंच सौ. सुप्रिया पालांडे, वावे गावचे सरपंच महेश उतेकर, शाखाप्रमुख सुभाष उतेकर, माजी सरपंच यशवंत रा.उतेकर,गोपीनाथ उतेकर, कुरवळ गावचे विष्णू उतेकर,चंद्रकांत उतेकर, मुसाड गावचे उपसरपंच मानसिंगराव सुर्वे,रमेश सुर्वे,ही सर्व मान्यवर मंडळी मा.आमदार भास्करजी जाधव साहेब यांची भेट घेऊन,सविस्तर चर्चा करून, झालेल्या अतिवृष्टीमुळे, पंधरागावं विभागात झालेल्या नुकसानीबाबत व विकास कामांबाबत यशस्वी चर्चा करण्यात आली.वं माननीयआमदार महोदयानी वरील उल्लेख केलेल्या कामांची लौवकरच पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे.त्याचप्रमाणे पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्थेला आर्थिक साहाय्य करण्याचे मान्य केले आहे. मान्यवरांच्या विनंतीला मान देऊन, आमदारांनी धामणंद पंचायत समिती गणांतील विभागात दोन दोन,तीन तीन गावं मिळून विकास कामांसाठी सभा घेण्याचे मान्य केले आहे.


Bundelikhabar

Related posts

आने वाले समय में बॉलीवुड में बंगाली बाला लोपामुद्रा साहा का जादू चलेगा

Bundeli Khabar

पूरग्रस्तांना वाढीव दरानेच मदत :मंत्री विजय वडेट्टीवार

Bundeli Khabar

सात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 10% आरक्षणामधून नियुक्त्या

Bundeli Khabar
error: Content is protected !!