20.1 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20210926 WA00092
महाराष्ट्र

मोहने येथील शांताराम पाटील शाळा येथे मोफत अँटीजेन आणि आरटी- पीसीआर टेस्ट उपलब्ध

Bundelikhabar

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा उपक्रम

संदीप शेंडगे/महाराष्ट्र
मोहोने : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने मोहोने येथील शांताराम महादु पाटील शाळा यादव नगर येथे मोफत अँटीजेन आणि आरटी- पीसीआर टेस्ट केंद्र सुरू करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. शोभा साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू असून नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आपली तपासणी करून घ्या अंगावर काढू नका असे आवाहन डॉ. शोभा साबळे यांनी नागरिकांना केले आहे. खाजगी लॅब मध्ये या टेस्ट करिता पाचशे ते सातशे रुपये घेतात परंतु कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून या टेस्ट करिता कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. वरील सुविधा मोफत व कोणताही त्रास न होता जलद गतीने मिळतात. तसेच रिपोर्ट तात्काळ उपलब्ध करून दिले जातात. कोव्हीड १९ चे लक्षणे आढळून आल्यास त्या रुग्णाला तात्काळ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये बेड उपलब्ध करून दिला जातो. यासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ रोहन सत्यवान उबाळे आणि कक्ष सेवक आकाश सतीश जावळे हे नागरिकांच्या सेवेकरिता सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सेवा देत आहेत नागरिकांनी खाजगी लॅबमध्ये उगीचच पैसे आणि वेळ वाया घालवू नये. या मोफत सेवेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे।


Bundelikhabar

Related posts

भाजपा शिवडी विधानसभा ई-श्रम कार्ड शिबीर

Bundeli Khabar

गावातील जन्माला आलेल्या मुलींसाठी तुळशी रत्न कन्या योजने अंतर्गत फिक्स डिपाँझिटचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते वाटप

Bundeli Khabar

महाराष्ट्र में मचा सियासी भूचाल मुख्यमंत्री के करीबी शिंदे ने की बगावत.

Bundeli Khabar
error: Content is protected !!