19.8 C
Madhya Pradesh
September 19, 2024
Bundeli Khabar
Home » वडीलांचे हसरे वात्सल्य
महाराष्ट्र

वडीलांचे हसरे वात्सल्य

कु. तन्वी संजय पिदूरकर
पुनवत, ता. वणी, जि.यवतमाळ

एका गावात परिस्थितीने दरिद्री असे दांपत्य राहत होते. रोजची कष्ट, वटवट असे त्यांचे आयुष्य दिर्घोद्योगी होते, पण त्यांची आस मात्र धनवानापेक्षा श्रेष्ठ होती. एकमेकांना नेहमी आधार लावायचे, त्यांची भांडणे तर कधीच होत नसत. अशीच काही वर्षे त्यांची परिश्रमातून गेली. त्यांच्या पोटी गोंडस असे बाळ जन्माला आले. त्या बाळाकडे पाहून ती दोघे सतत आपल्या आकांक्षा त्याच्या कानी घालीत असे. एकमेकांशी चर्चा करीत असत की, आपण आपल्या पोराला आपला गेला काळोख दाखवायचा नाही, त्याला खूप शिकवायच. थोडक्यात ते गोजिरवाणे बाळच त्यांचे कल्पवृक्ष होते. बाळाची आई एके दिवशी खूप आजारी पडली. तेव्हा ती आपल्या पतीस म्हणते, “धनी… मला जरा बरं नाही वाटत हो…” मी स्वयंपाक कसाबसा आटपते, तुम्ही तोवर माझ्याकरीता काही औषधं घेऊन येता काय..? तिचा पती म्हणतो, अगं होकी… आत्ता लगेच आणतो बघ. तिचा पती औषधं घेऊन येतो आणि म्हणतो, आणली बघ गं तुझी औषधं. चल आता वाढ लवकर दोघांनाही, कडाक्याची भूक लागली आजच्या धावपळीपायी. दोघेही जेवावयास पाठावर बसतात पण बाळाच्या आईला बर नसल्याने ती दोन घास कसे बसे खाऊन घेते कारण, तिला वाटत असतं की, मी जेवली नाही तर माझ्या नवऱ्याच्या पोटी सुध्दा अन्न जाणार नाही म्हणून नवऱ्याचे जेवण होई तोवर ती ताट घेऊन तशीच बसून असते।

गेल्या रोजच्या कष्टांमुळे बाळाची आई सारखी आजारी पडायची, तिला वैद्याकडेही दाखवायचे पण तिच्या अंगी रुजलेले आजार काही थांबत नव्हते. ती आई क्षणोक्षणी आपल्या नवऱ्याला चाचपळत सांगत असायची, धनी… मी आजारी आहे म्हणून खचून जाऊ नका, तुम्ही ठणठणीत आहात आणि असावे सुध्दा. माझे काय होणार, मी आता जगू शकणार की नाही याचा काही मला नेम उरलेला नाही. पण तुम्ही आपल्या पोराकडे नीट लक्ष ठेवाल, त्याला हव ते पुरवाल, त्याला चांगल शिकवाल. बाळाचे वडीलही सारखे विचारात गुंतलेले असायचे, कसं होणार आता आमचं ? माझ्या एका आधाराचा खांदाही आता वाकत चाललाय, एकटा कसा जगू मी..?? असा विचार करीत ते कधीकाळी लपून डोळ्यांतून अश्रू पाडायचे।

दोन चार दिवसांनी बाळाची आई तिच्या त्रासल्या आजारामुळे वारली, ज्या इच्छा आकांक्षाची ती वाट बघत असायची त्या अपेक्षा दिसनं तिच्या आजारपणापायी विझल्या होत्या. आता बाळाचे वडीलच त्याचा आधार उरला. बाळाच्या वडीलांनी बायकोच्या इच्छेप्रमाणे त्याला वाढवलं, त्याला चांगल्या शाळेत पाठवलं, त्याला हव ते ते दिले, अशी काही वर्षे गेलीत. आता बाळ तरुण झाले होते, शाळेत तो नेहमी अव्वल यायचा. शिक्षकही त्याचे पोट भरून कौतुक करीत असायचे. त्याच्या वडीलाला शाळेत बोलवायचे आणि म्हणायचे, “तुमचा मुलगा, खूप हुशार आहे!” तुम्ही त्याला असेच प्रोत्साहित करीत रहा. त्याला शिकण्यास नक्कीच बाहेर पाठवा. वडील परत घरी जात असतांना पोराच्या भविष्याचा विचार करीत असतात. गावच्या शाळेत पैशाविना शिकला तो, आता आम्हा दोघांची आस पूर्ण करनं त्याच्या हाती आहे. मी आजपासनं दुप्पट मेहनत घेणार आणि पोराला शिकण्याकरीता शहरी चांगल्या कॉलेजात पाठविनार, असे ते बडबडत आपल्या घरी निघाले।

मुलाची इच्छा की आपण समोर चालून वकील व्हायचे, आपल्या वडीलाचे नाव मोठे करायचे असे त्याचे स्वप्न कारण, त्याच्या वडीलांनीच त्याच्या आईची बाजू उत्तम बजावली होती. पुढे चालून तो वकील होण्यास पात्र सुध्दा झाला. माझ्या बायकोचे आणि माझे स्वप्न पोराने साकार करून दाखविले; आणि तो आता सुखात नांदणार या उल्हासापायी त्याच्या वडीलांनी गाव भर पेढे वाटप केले. मुलाच्या आईच्या फोटोकडे बघत ते म्हणाले, “कुठे निघून गेलीस गं तू..? तू असती तर तुझा हर्ष गगनात मावत नसता.” मुलाच्या यशापायी वडीलांच्या नयनांतून आनंदाचे अश्रू पाझरत होते।

मुलाचे लग्नाचे वय झाले, वडीलांनी त्याचे लग्न समारंभ थाटामाटात पार पाडले. मुलाची बायको त्यांच्या राहत्या घरी नांदू लागली, पण तिला मुलाच्या वडीलांचे घरात राहणे सहन होत नव्हते. ती सतत तिच्या नवऱ्याचे कान फुंकायची, मला तुमच्या वडीलांचे राहणे पटत नाही, ते म्हातारे झालेत आता माझ्या हातून त्यांची सोय होणार नाही अशी ती म्हणत असायची. यावर तिचा नवरा तिला समजावत असे, त्याच्या आईवडीलांचा गेला काळ तो तिला सांगत असे; पण ती काही मानायची नाही. कारण तिला स्वतःचे आयुष्य आरामात घालवायचे होते. तशी ती परावलंबी स्वार्थी होती. त्याच्या वडीलाला त्यांच्या सुनेचे चालते मन कळायचे पण ते नेहमी अचल असायचे, कारण ते शांत स्वभावाचे. दुसऱ्याचे सुख पाहून त्यांना आनंद होत असे।

एके दिवशी मुलगा वडीलांच्या जवळ जाऊन बसतो, गप्पा करू लागतो. त्यात तो म्हणतो, बाबा तुम्ही माझ्याकरीता खूप काही केले आणि मी ते चोख पार पाडले. बरोबर ना!! आता तुम्ही माझ ऐकाल… उद्या आपण दोघेही बाहेर फिरायला जाऊया. त्याच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी वडील बाहेर जाण्यास तयार झालेत. ते दोघेही निघतात, तेवढ्यात त्याचे वडील त्याला म्हणतात, बाळा कुठे निघालो आहे आपण..? जरा सांग तरी मला. तर तो मुलगा म्हणतो, बाबा खूप दिवस झालेत तुम्ही अजून गावाकाठचे वन बघितलेले नाहीत. पण त्याच्या वडीलाला मुलाच्या मनातलं सार आधीच कळालेलं असतं. मुलगा विचार करीत करीत झाडा झुडपातून वाट काढत जातो आणि त्याचे वडील वाटेत येणाऱ्या झाडांची एक एक पाने तोडत पायवाट सुरू ठेवतात. तिथे एका ठिकाणी ते दोघेही थांबतात. मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही तिथे काही वेळ थांबा मी आलोच. त्याचे वडील त्याला म्हणतात, “पोरा… ठाऊक आहे मला तू परत निघाला आहेस; पण जातांना जपून जा, तुझी घरची वाट गोंधळावी नाही म्हणून मी येतांना झाडांच्या पानांची वाट काढत आलो, कारण तू माझ्या विचारांत गुंतून होता.” मुलगा वडीलाला घट्ट मीठी मारतो आणि तिथून पळत जातो. पण त्याचे वडील हसत हसत त्याच्या जाण्याकडे बघत असतात।

असे ते श्रमजीवी अवर्णनीय त्याचे वडील. पोराच्या संतोषातच त्यांची खरी दौलत होती. कुठल्याही कैदखान्यात तो धाडो मला, तिथे मी हर्दमच्यावानी सुखीच राहणार. असा घट्ट विचार त्याच्या वडीलांच्या मनात जागा होता. शरीर थकत चालले तरीही त्यांचे मन पोटच्या पोराच्या विचाराने जिवंत होते. बाप हा बापच असतो. त्याची जागा परमेश्वर ही घेऊ शकत नाही.
असे त्या वडीलांचे हसरे वात्सल्य होते।

Related posts

अथर्व फाउंडेशन द्वारा बोरीवली में होगा रक्षा प्रदर्शनी का आयोजन

Bundeli Khabar

फेड एक्स ने पॉइण्‍ट-बेस्‍ड लॉयल्‍टी प्रोग्रामच्‍या विस्‍तारीकरणासह भारतीय ग्राहकांना केले पुरस्‍कृत

Bundeli Khabar

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची घेतली भेट

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!