25.9 C
Madhya Pradesh
July 26, 2026
Bundeli Khabar
IMG 20210922 WA0020
महाराष्ट्र

तरूण पञकारांचे मार्गदर्शक:किशोरजी बळीराम पाटील साहेब

Bundelikhabar

सत्यवान तरे/महाराष्ट्र
वाडा : महाराष्ट्र राज्यातून एकमेव आगरी समाजातील एका नामांकित दैनिकाचे संपादक म्हणून असलेले आदरणीय व्यक्तिमत्व मा.श्री.किशोर बळीराम पाटील यांचा 52 वा वाढदिवस 22सप्टेंबर 2021या दिवशी काही कारणास्तव साजरा केला नाही. तरी देखील ठाणे जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भ्रमणध्वनी,वॉट्स अप ,फेसबुक, सोशल मिडिया च्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग ,समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, मराठी पत्रकार संघ कोकण,यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. दैनिक स्वराज्य तोरण या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी आगरी समाजाबरोबर तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम केले आहे.त्यांची जिद्द आणि चिकाटीने ते त्यांनी आज दैनिक स्वराज्य तोरण या वृत्तपञाचे नावलौकिक मिळविले आहे।

त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दलच्या कामगिरीवर बोलायचे झाले तर शब्द अपुरे पडतील असे अफाट कार्य त्यांनी केले आहे.(आगरीसमाजाचे भुषण म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्रात घेतले जाते. तरूणांना आणि नव्या पञकारांना त्यांच्या आपल्या वृत्तपञात लिहीण्यासाठी त्यांनी संधी दिली .आणि भरपूर नवे पञकार घडविले आहेत. राजकीय घडामोडी व सामाजिक क्षेञात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना विवीध क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेतली व त्यांनी महाराष्ट्रातील पहिला आगरी संपादक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानात राज्यस्तरीय समिती सदस्य म्हणून नियुक्ती झाली.

पहिला आगरी संपादक जलयुक्त शिवार या पत्रकार पुरस्कार कमिटीवर नियुक्ती व आगरी गौरव पुरस्कार(2010.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे)श्रमजीवी संघटनेचा पत्रकार गौरव पुरस्कार (2011)वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली गौरव पुरस्कार(2013)आगरी महोत्सव आगरी गौरव पुरस्कार(2014)श्री संत काशिनाथ बाबा प्रतिष्ठान भिवंडी गौरव पुरस्कार(2014)अखिल भारतीय आगरी साहित्य विकास मंडळ आगरी पत्रकार भुषण पुरस्कार(2015)तगायत फाऊंडेशन बौध्द धर्म परिषद ठाणे धम्म पुरस्कार ठाणे (2015)तसेच शुभ सामाजिक संस्था गौरव पुरस्कार(2016)धर्मराज फाऊंडेशन आगरी कोळी महोत्सव गौरव पुरस्कार(2017)आगरी शिक्षण संस्था नवीन पनवेल पत्रकार गौरव पुरस्कार(2017) तसेच त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांना नुकताच महात्मा गांधी ग्लोबल पिस फाऊंडेशन भारत यांच्या वतीने भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार 2021 ने आर.एस.पी.कमांडर डॉ. मनीलाल शिंपी यांनी एका कार्यक्रमात सन्मानित केले. तसेच 2009 ते 2021 सालाबादप्रमाणे नियमित त्यांनी 13 वर्धापनदिन साजरे केले आहेत तसेच ११ व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार व ट्रॉफिक पोलीस यांना हेल्मेट रेनकोट देण्यात आले तसेच शालेय विध्यार्थी यांना टी शर्ट पेन वह्या व आरोग्य शिबीर व विवीध शासकीय समित्यांवर त्यांची नेमणूक झाली आहे. व या कामी त्यांना त्यांच्या परिवाराची मोठी साथ मिळते. ह,भ,प,श्री,बळीराम दादाजी पाटील(वडील)ह,भ,प.सौ,पार्वतीबाई बळीराम पाटील (आई) मोठे बंधू,श्री,अनंत पाटील,स्व. अशोक पाटील,पत्नी सौ,संगिता किशोर पाटील,(शाखाधिकारी सह्याद्री पतसंस्था शिवाजी नगर शाखा)मुलगा,कु,यतिष किशोर पाटील (स्वाफ्टवेअर इंजिनिअर)सद्या डीलाईट कंपनी पवई मुंबई येथे सर्व्हिस करत आहे. व,मुलगी कु,नेहा ही बीकॉम झाली असून सद्या ती सी,ए, ची आर्टिकल शिप करीत आहे असा परिवार आहे. दैनिक स्वराज्य तोरण हे 21 ऑगस्ट 2008 रोजी सुरू केले आणि त्यांच्या वयाची ५२ वी साजरी असली तरी काही कारणास्तव साजरी करण्यात येणार नाही.अशा मोठया व्यक्तीमत्व असलेल्या किशोरजी बळीराम पाटील साहेबांनी स्वराज्य तोरणच्या वृत्तपत्राच्या 12 वर्धापन दिन मोठया उस्तवात साजरे केले आहेत. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव आजार असल्यामुळे 12 वा 13 वा वर्धापन दिन साजरा करता आला नाही मात्र या दोन वर्षाच्या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी स्विकारत प्रदेश अध्यक्ष श्री.वसंत मुंढे,प्रदेश संघटक श्री.संजय भोकरे,प्रदेश सरचिटणीस श्री. ह.भ.प.श्री.विश्वासराव आरोटे,कोकण विभाग अध्यक्ष श्री.नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली पत्रकारांसाठी आर्थिक मदती पासून ते रेशन कीड साहित्य वर्षभर पुरेल अशा प्रकारे मदतीचा हात पुढे केला हे वाख्याण्या जोगे आहे.व त्यांचा वाढदिवस देखील मोठे बंधु कोरोनाच्या आजाराने निधन पावल्याने करण्यात येणार नाही.त्यामुळे वॉट्स अप च्या माध्यमातुन किशोरजी पाटील साहेबांना वाढदिवसाच्या माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून मनःपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा।


Bundelikhabar

Related posts

हृदयाच्या रुग्णांनी प्रवास करताना अशी घ्या काळजी

Bundeli Khabar

महा आवास अभियान पुरस्कारावर ठाणे जिल्हा परिषदेची मोहोर

Bundeli Khabar

संकट संपलेलं नाही

Bundeli Khabar
error: Content is protected !!