25.3 C
Madhya Pradesh
October 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20210913 WA0026
महाराष्ट्र

वाडा -भिवंडी महामार्गावर बोटिंग सेवा सुरू, स्पीड बोट आणि जॅकेट घालून तरुणांच लक्षवेधी आंदोलन

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
वाडा : पालघर – मनोर -वाडा -भिवंडी या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज तरुणांकडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले व स्पीड बोट आणि जॅकेट घालून या महामार्गावरील खड्ड्यात वाडा-भिवंडी मार्गावर बोटींग सुविधा सुरू करण्यात आल्याचे फलक हातात घेऊन तरुणांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला .

वाडा ते भिवंडी या 40 किलोमीटरचा महामार्ग खड्डेमय झाला असून दरवर्षी या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये निधी खर्च केला जातो . मात्र आजही या महामार्गावर हजारो खड्डे असून रोज अपघातांची मालिका सुरूच आहे . अनेक मोठमोठे खड्डे या महामार्गावर असल्याने अनेक वाहने या खड्ड्यांमध्ये अडकून पडत आहेत. या सगळ्याकडे येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय बाबू या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असल्याने तरुणांनी अनोखी शक्कल लढवत आंदोलन केलं .


Bundelikhabar

Related posts

तीन कृषी कायदे रद्द, काँग्रेसने साजरा केला पेढे वाटून विजय दिवस साजरा

Bundeli Khabar

सैनी इंडिया का रिकॉर्ड प्रदर्शन

Bundeli Khabar

अष्टपैलू व्यक्तीमत्व स्वप्नील पाटील नेशन बिल्डर अवाॅर्डने सन्मानि

Bundeli Khabar
error: Content is protected !!