30.4 C
Madhya Pradesh
September 30, 2026
Bundeli Khabar
IMG 20210911 WA0016
व्यापार

आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रथम इलेक्ट्रिक वाहन महापौर किशोरी पेडणेकर यांना सुपूर्द

Bundelikhabar

बृहन्मुंबई महापालिकेच्या ताफ्यात ५ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश।

किशोर पाटील/महाराष्ट्र

मुंबई : पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने (E.V.) ही काळाची गरज असून नागरिकांनी पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करावा या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या ताफ्यात ५ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिक वाहन दिवस असून या दिनाचे औचित्य साधून प्रथम इलेक्ट्रिक वाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (परिवहन) (शहर) विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.अजयकुमार यादव यांच्या हस्ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना महापौर निवासस्थानी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात दि. ९ सप्टेंबर २०२१ रोजी सुपूर्द करण्यात आले.तसेच याप्रसंगी उपप्रमुख अभियंता (घ.क.व्य.) (परिवहन) श्री. सुनील सरदार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी उपस्थित होते।


बृहन्मुंबई मनपाच्या ताफ्यात समावेश झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असणा-या वाहनांच्या ताफ्यात सध्या ९६६ वाहने आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल यासारख्या खनिज तेलावर चालणा-या वाहनांसह सीएनजी सारख्या पर्यावरणपूरक वाहनांचाही समावेश आहे. याच ताफ्यामध्ये आजपासून ५ इलेक्ट्रिक वाहनांचा देखील समावेश करण्यात आला आहे. ‘टाटा नेक्सॉन ईव्ही एक्सझेड प्लस’ व्हेहिकल असे मॉडेल नाम असणा-या सदर पाचही कार या केंद्र सरकारच्या अखत्यारितील एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लि. या कंपनीकडून ‘ड्राय-लीज’ पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत. ही वाहने ‘ड्राय-लीज’ पद्धतीने सवलतीच्या दरात खरेदी करण्यात आली असल्यामुळे सदर वाहनांसाठी दरमहा रुपये २७ हजार इतका खर्च असणार असून यामध्ये परिरक्षण व दुरुस्तीचा देखील समावेश आहे. सदर वाहनांमध्ये परंपारिक खनिज तेल वापरण्यात येत असल्यामुळे या वाहनातून हरित वायू, कार्बनडायऑक्साईड इत्यादी प्रतिकूल वायुंचे उत्सर्जन होत नाही. ही वाहने साधारणपणे पुढील ८ वर्षे महापालिकेच्या सेवेत असणार आहेत।


Bundelikhabar

Related posts

ट्रूव मोटर ने हाइपर-मैक्सी स्कूटर ‘एच2’ का टीज़र जारी किया

Bundeli Khabar

गोदरेज अँड बॉयस तर्फे खंडाळा येथील तोंडाळ मच्छिमार समाजाला मदत

Bundeli Khabar

अमेरिकन डॉलरला सोन्याचे बळ तर तेलाच्या किंमतींनी तुटवड्याची चिंता वाढवली

Bundeli Khabar
error: Content is protected !!