26.4 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210903 WA0008
महाराष्ट्र

टायगर ग्रुप च्या नावाचा गैरवापर केल्यास तातडीने हकालपट्टी करू संस्थापक अध्यक्ष तान्हाजी जाधव

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
‌मुंबई : टायगर ग्रुप चे कार्य देशातील काही राज्यांमध्ये सुरू असून समाजसेवा हीच जनसेवा मानून गावोगावी कोणावरही अन्याय अत्याचार झाल्यास त्यावर मार्ग काढून देणे ही आमची कामाची पद्धत आहे तर त्या पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी खरी गरज आहे तेथे मदतीचा हात देणे ती मदत रोख स्वरूपात असेल किंवा तन मन धन या उक्तीप्रमाणे प्रत्येक कार्यकर्ता सभासदांनी मनोभावे सेवा केली पाहिजे मात्र कोणी टायगर ग्रुप च्या नावाचा गैरवापर करून चुकीचे काम करत असेल त्याची तातडीने हकालपट्टी केली जाईल असा प्रकार मी कधीही खपून घेणार नाही टायगर ग्रुपचे ध्येय उद्दिष्ट हे व्हिडिओ असून अन्याय अत्याचार यातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊन त्यांचे संरक्षण करणे हेच आमचे काम आहे ही राजकीय संघटना नाही यामध्ये कोणालाही निवडणूक लढवायची नाही यामध्ये जो काम करेल तोच खरा टायगर टायगर हे नाव प्रत्येक कार्यकर्त्याने मनामध्ये आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा असून कोणीही आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडून शंभर टक्के काम होणार ही खात्री टायगर ग्रुप च्या कार्यकर्त्याकडे आहे म्हणून सर्वसामान्य जनता आपल्याकडे येते त्या जनतेचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आपण काम करावे काम करत असताना त्या जनतेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो मात्र जर कोणी कोणाचे भांडण व कोणाच्या व्यवसायामध्ये या नावाचा गैरवापर करून कोणालाही दमबाजी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तो खपवून घेतला जाणार नाही संयमी शांत ही आपली लोकप्रियता असून आपण समाजसेवेचे व्रत हाती घेतला आहे समाज सेवा करत असताना आपल्याला काही मिळेल ही कधी अपेक्षा धरू नये नतेचे प्रश्‍न सोडवत असताना येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला सामोरे जाऊन आपण आपल्या भागात टायगर ग्रुप ची वेगळी भूमिका स्पष्ट केली ।

पाहिजे लोकांचा कल आपल्याकडे का येतो तर टायगर या नावांमध्ये एक वेगळेपणा असून हे काम टायगर करू शकतो असे काम प्रत्येकाने करावे कोणाच्याही खाजगी भांडणाचा गैरवापर करून कुणाच्या व्यवसायात तर कोणाच्या खाजगी जीवनात लक्ष न घालता सामाजिक शैक्षणिक या कार्यात जेवढे काही मदत लागेल ती मदत करण्यास मी सक्षम आहे आपल्या काठीचा वापर करून कोणी आपला गैरफायदा घेत असेल तर आपल्या कार्यकर्त्यांनी देखील आपल्या काठीचा वापर करून दिला नाही पाहिजे कारण सर्वधर्मसमभाव ही शिकवण आपली असून त्यामुळे या परिवारात काम करत असताना कोणी चुकीचे काम करत असेल तर मला नक्की कळवा टायगर ग्रुप च्या नावाखाली आपल्या भागात कोणी असा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास मला फोन करून माहिती द्यावी त्याची आमच्याकडून हकालपट्टी केली जाईल असे काम करणाऱ्यांना आम्ही कधीही साथ देणार नाही व ते आमचे टायगर ग्रुपचे सदस्य कधी राहू शकत नाही टायगर ग्रुप चे कार्य व कार्यप्रणाली ही संपूर्ण हिंदू राष्ट्राला मान्य आहे या मध्ये येणारा कार्यकर्ता हा समाजसेवेचे अंगीकारक असावा ही माझी पहिल्यापासून प्रत्येक छोट्या-मोठ्या व वुद्ध महिला भगिनी या सर्वांना सूचना वजा विनंती असते त्यामुळे कोणी टायगर ग्रुप च्या नावाचा गैरवापर केल्यास तो कधीही खपवून घेतला जाणार नाही असा सणसणीत इशारा टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव यांनी दिला आहे।


Bundelikhabar

Related posts

फसल संरक्षण में मददगार है कृषि रसायन

Bundeli Khabar

खोट्या व बनावट दस्तऐवज प्रकरणी शागिर्द डेकोरटर्स चे मालक पिता पुत्रावर गुन्हा दाखल, अटक कधी

Bundeli Khabar

१५ अगस्त स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवी पूर्वसंध्येला ७५ फळ झाडांची लागवड

Bundeli Khabar
error: Content is protected !!