35.6 C
Madhya Pradesh
June 16, 2024
Bundeli Khabar
Home » मिठी नदीवर तरंगणा-या कच-याची लागणार विल्हेवाट
महाराष्ट्र

मिठी नदीवर तरंगणा-या कच-याची लागणार विल्हेवाट

संतोष साहू/महाराष्ट्र
मुंबई : मिठी नदीतील गाळाची समस्या सोडविण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज कचरा संकलन यंत्र मिठी नदी परिसरात कार्यरत झाले असून याद्वारे नदीवर तरंगणा-या कच-याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. फिनलँडमधील कंपनी क्लीनटेक स्टार्टअप रिव्हरसायकलने या यंत्राचा शोध लावला आहे. नदीतून कचरा उचलण्याच्या पहिल्या प्रयत्नाला चालना देण्यासाठी जगभरातील ग्राहकांना उत्कृष्ठ पॅकेजिंग सुविधा प्रदान करणा-या उद्योगक्षेत्रातील आघाडीची कंपनी हुतामाकीने आर्थिक मदत म्हणून या प्रकल्पाला ६००,००० युरोची देणगी दिली आहे. हुतामाकीच्या सहकार्याने एक नमुना कचरा संकलक बनवण्यात आला आणि त्याची फिनलँडमध्ये चाचणी घेण्यात आली. त्यानंतर तो मुंबईत आणला जाऊन त्याची एकसलग बांधणी करण्यात आली असून पुढील १२ महिने मिठी नदीतील कचरा गोळा करणार आहे।


हुतामाकीने नदीवर तरंगणा-या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी रिव्हररिसायकल व व्हीटीटीशी संयुक्त भागीदारी केली आहे. नवीन तंत्रज्ञानाचे नदीतील कचरा संकलन करणारे यंत्र आता मुंबईमधील मिठी नदीवर कार्यरत झाले आहे। मिठी नदी प्रकल्प हा युएनटीआयएल (ज्याला आता युएन ग्लोबल पल्स म्हणतात), व्हीटीटी टेक्निकल रिसर्च सेंटर ऑफ फिनलॅंड लि.,रिव्हर रीसायकल आणि अर्थ५आर या भारतातील पर्यावरणीय मोहीमांमध्ये सक्रियअसलेल्या संस्थांच्या जागतिक स्तरावर संयुक्त विद्यमाने चालवला जात आहे. हुतामाकीकडून मिळालेली देणगी ही एक वर्षात रिव्हर क्लीनर चालू करण्यापासून, तो सेट अप करताना आणि कार्यरत ठेवले जात असताना कच-याची परिणामकारकरित्या विल्हेवाट लावण्याच्या आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीकोनातून पुनर्वापर करण्याच्या कौशल्यांवर अनुभव येण्याच्या कार्यशाळा आयोजित करण्यासाठी वापरण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये व्हीटीटी टेक्निकल रिसर्च सेंटर ऑफ फिनलँडला तरंगणारा कचरा आणि ऋतूनुसार स्वच्छता कार्यामध्ये अधिकाधिक सुधारणा करण्याच्या बाबतीत देखील माहिती प्रदान करते, ज्यामुळे भविष्यातील सफाईची कार्ये आणि पुनर्वापर प्रक्रिया देखील सुधारते.
हुतामाकी येथे फ्लेझिबल पॅकेजिंग विभागाचे व्य.वस्थापकीय संचालक सुदीप माळी यांनी सांगितले की, “आम्हाला या जागतिक भागीदारीचा भाग झाल्याबद्दल आणि मुंबईच्या महत्त्वाच्या भागातून वाहणार्याम एकमेव नदी असलेल्या मिठी नदीला स्वच्छ करण्यामध्ये आम्हाला मदत करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये प्रचंड उत्साह वाटत आहे. या प्रकल्पामध्ये प्लास्टिक कचरा संकलित करण्याच्या दैदीप्यमान दृष्टीकोनाचा अवलंब करत स्थायी विकासाला चालना मिळते, त्याचबरोबर स्थानिक समाजांना ज्ञान व उपजीविकेचे साधन प्राप्त करण्यासाठी सक्षम बनवले जात आहे.’’।


व्हीटीटी टेक्निकल रिसर्च सेंटर ऑफ फिनलँड लि. चे ज्येष्ठ वैज्ञानिक जुक्का सॅसि यांनी सांगितले की, “हुतामाकीने केलेल्या अर्थसहाय्यामुळे ऑप्टिकल सेंसर्स आणि तरंगणा-या प्लास्टिकच्या वस्तू शोधण्यासाठी आणि प्लास्टिक व सेंद्रिय वस्तूंमध्ये भेद करण्यासाठी आवश्यक असलेले ड्रोन्स मिळवण्यात मदत झाली. व्हीटीटीच्या योगदानामुळे पायरॉलिसिस चाचणी करता आल्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मिळवलेल्या प्लास्टिक कचर्यामच्या रासायनिक पुनर्वापराबद्दल परीक्षण करण्यात मदत होते. अधिक विस्तृत पातळीवर आम्ही प्लास्टिक कचर्यायपासून होणार्याप प्रदूषणाच्या जागतिक समस्येवर उपाय शोधून या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचे आमचे ध्येय आहे. तांत्रिक समावेशाबरोबरच आम्ही स्थानिक भागीदार आणि समाजाला प्रकल्पाच्यायशाचे महत्त्वाचे शिलेदार म्हणून त्यांच्या योगदानाचे कौतुक देखील करतो ।

Related posts

चार इंजीनियरों को शहर में सड़कों की खराब स्थिति को लेकर निलंबित

Bundeli Khabar

वृद्धाश्रमातल्या विधवांसाठी आरोग्य शिबीर

Bundeli Khabar

हृदयाच्या रुग्णांनी प्रवास करताना अशी घ्या काळजी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!