23.6 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20210901 WA0004
महाराष्ट्र

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकरण्याचे निस्वार्थ प्रशिक्षण,आरती शर्मा यांनी दिले शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
मुंबई : कोरोनाने जगाला हतबल करून सोडले आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत अनेक अडचणी निर्माण झाल्या असून त्यासाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना ही सुरक्षेसाठी पूरक ठरणार आहे आणि हिच पर्यावरण संवर्धनाची संकल्पना घेवून ठाणे येथील आरती शर्मा यांनी १२ पेक्षा अधिक कार्यशाळा घेतल्या असून त्यातून दोन हजार पेक्षाही अधिक जणांना शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. विविध शाळांमध्येही त्यांनी विद्यार्थ्यांना सामूहिक प्रशिक्षण दिले आहे।

आपला बाप्पा कसा पर्यावरणपूरक असेल याचाही आपण विचार करणे गरजेचे आहे कारण प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या मूर्तीपासून प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. व्यापक सामाजिक जाणिवेतून हे प्रदूषण रोखणे आणि पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याची गरज आता निर्माण झाली आहे त्यासाठी कला क्षेत्रातील प्रसिद्ध स्केचो अ‌ॅक्टीवीटी सेंटर व बिगीन लाईफ फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी मोफत ऑनलाइन व ऑफलाइन पर्यावरणपूरक पर्यावरण रक्षण शाडू मातीपासून ८८ मुलांचे इको फ्रेंडली गणपती मूर्ती मेकिंग कार्यशाळेचे “पांडे भवन” दिघा, नवी मुंबई, येथे रविवार २९ ऑगस्ट २०२१ दु ३:00 ते ४:३० या वेळेत आयोजन करण्यात आले होते. प्रदूषण विरहित व नैसर्गिक विसर्जनाची सुरवात व्हावी यासाठी मूर्तिकार चित्रकार आरती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या हातांनी बाप्पाची इकोफ्रेंडली मूर्ती साकारण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र या कार्यशाळेत दिले.अधिक माहितीसाठी ९३७२२२३६११ या क्रमांकांवर संपर्क साधावा।


Bundelikhabar

Related posts

146 जिला परिषद कर्मचारियों के तबादले

Bundeli Khabar

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज आरोग्य शिबिराचे भिवंडी शहरातील गुरुकृपा हॉस्पिटल नारपोली येथे आयोजन

Bundeli Khabar

विजय बामुगडे यांना “अभिमान महाराष्ट्राचा पुरस्कार” प्रदान

Bundeli Khabar
error: Content is protected !!