24.9 C
Madhya Pradesh
September 2, 2026
Bundeli Khabar
IMG 20210823 WA0018
महाराष्ट्र

एक शिक्षक मनात ठरवलं तर कोणतेही काम करू शकतो – मच्छिंद्र कदम

Bundelikhabar

किशोर पाटिल/महाराष्ट्र
४०शिलाई मशिन देणारा दाता हा आमच्या समाज्याचा आहे हे ऐकुन आमचा आनंद द्विगुणित झाला- शांताराम सावळे
मी दाता नसुन समाज्याचा सेवक आहे – डॉ. मनिलाल शिंपी

आत्मनिर्भर शिवण मशिन योजने अंतर्गत गरीब गरजु महिलांना
शिलाई मशिन चे मोफत वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न!
नंदुरबार दि.२३(किशोर पाटील) अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था आयोजित, स्वामी नारायण ट्रस्ट कल्याण,रोटी डे ग्रुप व कच्छ युवक संघ यांच्या सौजन्याने शनिवार दि.२१/०८/२०२१ रोजी जेष्ठ नागरिक सामाजिक सभागृह रेस्ट हाऊसच्या मागे नेहरूनगर नंदुरबार,येथे आत्मनिर्भर शिवण मशिन योजने अंतर्गत गरीब गरजु महिलांना शिलाई मशिन चे मोफत वाटप , विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी तसेच कोरोणा काळात चांगले काम करणाऱ्या शिक्षक, महिला समजा सेवीकांचा हिरकणी पुरस्कार प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला।


सदर कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था मा.श्री.रविंद्र बाबा बागुल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री. मच्छिंद्र कदम,श्री.शांताराम बापु सावळे(विश्वस्त अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था ) डॉ.श्री. आर एस् पी युनिट ठाणे कमांडर मनिलाल रतीलाल शिंपी, डॉ.श्री.दिनेश बळवंतराय ठक्कर,(अध्यक्ष स्वामी नारायण ट्रस्ट कल्याण) मा.श्री.किशोर बळीराम पाटील संपादक दैनिक स्वराज्य तोरण तथा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग,आर एस पी अधिकारी श्री. बन्सीलाल महाजन,आर एस पी अधिकारी श्री. घनश्याम सोनवणे, श्री.सुनिल बापू निकुंभ(माजी अध्यक्ष)श्री.संजय खैरनार (राष्ट्रीय सचिव) श्री.विजय कुमार खैरनार, रोहित करटे, जयंत कंन्नरकर, मार्गदर्शक शिंपी समाज , सौ.जोशीला अमर पगारिया (सामाजिक कार्यकर्त्या साक्री), सौ.आरती किशोर दुसेजा (साक्री), अहिर शिंपी समाज नंदुरबार जिल्हा अध्यक्ष श्री सुभाष सावळे,श्री.प्रदीप शिंपी (सचिव)श्री.सोमनाथ शिंपी(नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष)श्री.बळवंत निकुंभ(जिल्हा कोषाध्यक्ष) श्री.योगेश शिंपी(जिल्हा सहसचिव),श्री. लोटन बाविस्कर (जिल्हा कार्यालय प्रमुख)श्री.विजय देवरे (प्रसिद्धीप्रमुख)श्री.पुरुषोत्तम शिंपी उप संपादक नामविश्व, आदी मान्यवर व शिंपी समज्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अध्यक्ष नंदुरबार श्री.सुभाष सावळे,व जिल्हा कार्यकारिणी यांनी केले होते।


सर्वप्रथम ही या कार्यक्रमाच्या आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो कारण त्यांनी विविध उपक्रम राबऊन आपल्या समाजाला पुढे नेण्याचे काम करत आहेत.विशेष म्हणजे डॉ.तथा आर एस पी कमांडर ठाणे युनिटश्री. मनीलाल शिंपी हे एक अभ्यासु शिक्षक आहेत.त्यांनी शिक्षक म्हणून काम करीत असताना आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतो हा उद्देश समोर ठेऊन ठाणे जिल्ह्या पासून सुरू केलेले काम आज नंदुरबार जिल्ह्या पर्यंत पोहचविले म्हणून त्यांची आमच्या जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी यथोचित सन्मान केला.व आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज बहुउद्देशीय संस्था व नंदुरबार जिल्हा अहिर शिंपी समाज यांनी त्यांच्या आई वडिलांसह स्वपत्निक सन्मान करून त्यांच्या कार्याची पावती दिली.म्हणून मी सांगतो की एक शिक्षक मनात ठरवलं तर कोणतेही काम करू शकतो असे यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी श्री मच्छिंद्र कदम यांनी यावेळी सांगितले।


मी अनेक वर्षापासून समाजाचे काम करतो व हे काम करत असताना राष्ट्रीय अध्यक्ष श्री.रवींद्र बागुल यांनी समाजातील गरीब गरजु महिलांना शिलाई मशिन वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता ६१ मशीन त्यांनी वाटप केल्या होत्या त्यांना शंभर चा आकडा पूर्ण करायचा होता ही बातमी डॉ.श्री. मनीलाल शिंपी यांना समजली त्यांनी कोणताही विचार न करता संस्थेशी संपर्क साधला व क्षणार्धात मी ४० मशीन देतो सांगितले.मला जेव्हा हे समजले तेव्हा ४० मशीन देणारा दाता हा आमच्या समाजाचा आहे हे एकूण माझा आनंद द्विगुणित झाला असे विश्वस्थ श्री.शांताराम सावळे यांनी यावेळी सांगितले।


माझ्या आई वडीलांनी मला जे संस्कार दिले,शिकविले त्यामुळे मी इथ पर्यंत आज पोहचलो आहे. त्याच बरोबर माझी पत्नी संगीताने ही मला सुख दुःखात सहभागी होऊन मोलाची साथ दिली म्हणून हे सामाजिक, शैक्षणिक काम मी करू शकलो.मला या ठिकाणी दाता म्हणून उपाधी दिली असली तरी मी दाता नाही एक सेवक आहे व माझ्या सोबत असलेले श्री.दिनेश भाई ठक्कर,संपादक श्री किशोर पाटील,धर्म सेवक डॉ.सोन्या पाटील,समाजसेवक श्री.रामचंद्र देसले,श्रीधर पाटील हे खरे दाते आहेत.व त्यांच्या सहकार्या मुळेच मी हे आज काम करीत आहे असे यावेळी डॉ. मनीलाल शिंपी यांनी सांगितले.यावेळी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री किशोर बळीराम पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र बागुल,माजी अध्यक्ष श्री.सुनिल निकुंभ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तर प्रास्ताविक श्री.संजय खैरनार यांनी केले. या कार्यक्रमात डॉ.श्री.दिनेश भाई ठक्कर यांचाही मान्यवरांच्या शुभ हस्ते विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रदीप शिंपी यांनी केले.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज बहुउद्देशीय संस्था व अहिर शिंपी समाज नंदुरबार जिल्हा यांच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सोमनाथ शिंपी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले।


Bundelikhabar

Related posts

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १,५०० रुपयांची वाढ, मोबाईलही मिळणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Bundeli Khabar

Adarsh ​XI, Panvel team became “Badshah”

Bundeli Khabar

चार वर्षों में पुणे मनपा के नगरसेवकों ने 11 करोड़ 57 लाख के थैले बांटे

Bundeli Khabar
error: Content is protected !!