28.3 C
Madhya Pradesh
October 26, 2026
Bundeli Khabar
IMG 20220119 WA0004
महाराष्ट्र

नाना पटोले यांच्या अटकेची मागणी

Bundelikhabar

भाजप शिवडी विधानसभा तर्फे जाहीर निषेध

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या अनेक नेत्यांनी केली आहे. शिवडी विधानसभेतील भाजप पदाधिकाऱ्यांनीही आज, मंगळवारी पटोले यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे।

तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी पटोले यांचा निषेध व्यक्त केला. भारतमाता लालबाग येथे नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ह्या आंदोलनात भाजप मुंबई उपाध्यक्ष व बेस्ट समिती सदस्य राजेश हाटले तसेच शिवडी विधानसभेतील सर्व पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष व महिला मोर्चा आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

घाटकोपर प्रकल्पअंतर्गत सही पोषण देश रोशन कुपोषण निर्मूलन कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

Bundeli Khabar

शरद पवार इन्स्पायर फेलोशीप’ गुणवंतांना प्रदान

Bundeli Khabar

इतर राज्यांनी अनुकरण करावे असे सर्वंकष व उत्तम सांस्कृतिक धोरण तयार करणार – सुधीर मुनगंटीवार

Bundeli Khabar
error: Content is protected !!