35.8 C
Madhya Pradesh
May 31, 2026
Bundeli Khabar
महाराष्ट्र

डॉ.सदानंद पाटील यांच्या अमृत महोत्सवी पुस्तक प्रकाशनाचे भाग्य मला मिळावे – ना.कपिल पाटील

Bundelikhabar

डॉ.सदानंद पाटील यांच्या अमृत महोत्सवी पुस्तक प्रकाशनाचे भाग्य मला मिळावे – ना.कपिल पाटील
साहित्यिक डॉ. सदानंद पाटील यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तकाचं प्रकाशन ना. मा. कपिलजी पाटील यांच्या हस्ते दिल्ली येथे संपन्न……

भिवंडी / कीशोर पाटिल

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील आगरी समाजाचे एकमेव साहित्यिक ,कवी,लेखक डॉ. सदानंद सिताराम पाटील यांनी पिंपळपान या पहिल्या काव्य स्संग्रहा नंतर ते कधीच न थांबता लिखाण कायम सुरू ठेऊन अखेर त्यांनी ‘निरभ्र आकाश’ (काव्य), ‘नीलांबर’ (काव्य), ‘आवर्तन’ (काव्य) आणि शेवटचे पन्नासावे सुवर्णपान’ (काव्य) लिहून या पन्नासाव्या “सुवर्ण महोत्सवी” पुस्तकाचे प्रकाशन सोहळा नुकताच केंद्रीय ‘पंचायत राज’ राज्यमंत्री मा.ना. श्री. कपिलजी पाटील यांच्या नॉर्थ अॅव्हेन्यू नवी दिल्ली येथील निवास्थानी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला।
डॉ. सदानंद सिताराम पाटील यांच्या रौप्यमहोत्सवी, पंचविसाव्या पुस्तकांचे प्रकाशन १३ ऑगस्ट २०१७ रोजी मा. कपिलजी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले होते. अवघ्या चार वर्षात सुवर्ण महोत्सवी पुस्तकाचं प्रकाशन नामदार कपिलजी पाटील यांच्याच हस्ते करण्यात आले।
सुवर्ण महोत्सवी प्रकाशनाबद्दल नामदार कपिलजी पाटील यांनी आनंद व्यक्त केला. माझा मित्र, ग्रामीण पार्श्वभूमी असलेले शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व पन्नास पुस्तके लिहून आपलं उत्तरदायित्व सिद्ध करतो याचा मला सार्थ अभिमान वाटतो व अमृत महोत्सवी पुस्तकाचं प्रकाशन करण्याचे भाग्यही मलाच लाभो अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या।
या शुभ प्रसंगी पाईपलाईन विभागिय विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. शंकर भोईर, सचिव श्री. प्रेमनाथ नाईक, सहसचिव श्री. राम काळुराम पाटील, इंग्रजी माध्यमाचे शाळा समिती अध्यक्ष श्री. वसंत तरे, श्री. जगदीश म्हात्रे, श्री. वामन गुळवी, प्रकाशिका सौ. साधना पाटील, श्री. ऋषिकेश सदानंद पाटील, सौ. तृप्ती ऋषिकेश पाटील, सौ. स्वाती भोईर, श्री. बंडू पाटील, कु. वेद, कु. रुद्र व युगांत व आदी मान्यवर उपस्थित होते।
याच कार्यक्रमाचे औचित्य साधुन भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय जन सम्राट खासदार श्री कपिलजी पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पंचायत राज केंद्रीय राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल कपिलजी मोरेश्वर पाटील सत्कार समितीच्या वतीने मा.ना.कपिल पाटील साहेब यांचे मानपत्र प्रदान करुन सत्कार करण्यात आले।
डॉ. सदानंद पाटील यांची २९ डिसेंबर २०२० रोजी १५ पुस्तके प्रकाशित झाली होती.
डॉ. सदानंद पाटील हे निवृत्त प्राचार्य असून निवृत्तीनंतर अवघ्या आठ वर्षात ३३ पुस्तकांचं लिखाण करून समस्त आगरी समाजातील सर्वाधिक पुस्तके प्रकाशित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे.त्यांच्या अगोदर एका लेखकाने ३३ पुस्तके प्रकाशित केली आहेत. म्हणून ते आज ५० पुस्तके प्रकाशित करून आगरी समाजात नंबर एक चे लेखक,कवी झाले आहेत।
सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, राजकीय विषयांवर परखडपणे लिखाणात त्यांचा हातखंडा आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व्यासपीठावरून ते समाज प्रबोधनाचं कार्य अव्याहतपणे करीत आहेत.
२०१३ मध्ये स्वेच्छा निवृत्तीनंतर कौटुंबिक, वैयक्तिक तसेच विद्यार्थांना, पालकांना करिअर गाईडंसच्या माध्यमातून त्यांची सेवा अव्याहत सुरु आहे.
डॉ . सदानंद पाटील यांना विविध सामाजिक, शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रातून जवल जवल २८ हून अधिक मानसन्मान मिळाले आहेत। आंतरराष्ट्रीय,राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार त्यांच्या साहित्यिक व शैक्षणिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना मिळाले आहेत.
डॉ. सदानंद पाटील यांना दोनदा जिवन गौरव पुरस्कार मिळाले असून २१ जुलै २०२१ रोजी इंडिया बेस्ट टिचर एज्युकेशनॅलिस्ट अॅन्ड जनसेवा नॅशनल अॅवार्डने ज्ञानराज ट्रस्ट अॅन्ड कृष्णाजी फौंडेशन यांच्याकडून सन्मानित करण्यात आले आहे।
डॉ. सदानंद पाटील यांच्या साहित्यिक क्षेत्रातील कार्यकर्तुत्वाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
डॉ. सदानंद पाटील यांचे साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आदर्शनिय आहे. त्यांच्या या यशस्वी कार्याला दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…


Bundelikhabar

Related posts

महापालिकेच्या जे प्रभागातील अतिधोकादायक इमारतीवर निष्कासनाची कारवाई

Bundeli Khabar

सरकारी नौकरियों के लिए ‘अपग्रेड-एग्जामपुर’ का अधिग्रहण

Bundeli Khabar

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Bundeli Khabar
error: Content is protected !!