29.1 C
Madhya Pradesh
July 26, 2026
Bundeli Khabar
Uncategorizedमहाराष्ट्र

ज्या ज्या संस्थांनी सढळ हाताने मदत केली त्या सर्व संस्था चालकांचे मनापासून आभार मानतो -आ.विश्वनाथ भोईर

Bundelikhabar

कल्याण : मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून, समाज कल्याण न्यासचे संस्थापक – अध्यक्ष धर्मसेवक डॉ. सोन्या काशिनाथ पाटील,लेडीज एक्स्प्रेस ग्रुप कल्याण, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ.दिनेशभाई ठक्कर,इच्छामणी महिला भजनी मंडळ कल्याण,व राजस्थान शिंपी समाज कल्याण, यांच्या विशेष सहकार्याने दिव्यांग, अंध ,अपंग, भगिनींना दिवाळी फराळ,रेशन कीट व साडी वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य कल्याण येथील कार्यालयात संपन्न झाला. आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत म्हात्रे, उद्योजक समाजसेवक डॉ रामचंद्र देसले

IMG 20241104 WA0015

पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष श्री.सोमनाथ बाळाराम ठाकरे,लेडीज एक्स्प्रेस ग्रुपच्या सौ. मधूबेन ठक्कर,डॉ.स्नेहल बोधे,स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ.दिनेशभाई ठक्कर,इच्छामणी महिला भजनी मंडळ अध्यक्ष सौ.संगीता पष्टे, राजस्थान शिंपी समाजाचे सचिव नटवरलाल वर्मा, श्रीमती शिल्पा टाकळकर समाजसेविका कल्याण यांच्या उपस्थितीत दिपावली व भाऊबीज भेट कार्यक्रम शनिवार दिनांक २ नोव्हेंबर २०२४ रोजी हातमजूरी करणारे गरीब गरजू तसेच दिव्यांग,अंध, अपंग, बंधू भगिनिंना साडी व फराळ वाटप
कल्याण पश्चिम येथील श्री साई बाबा मंदिराजवळ लालचौकी येथे करण्यात आले.
सदर कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून कल्याण पश्चिमचे आमदार श्री.विश्वनाथ भोईर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून उपस्थितांना संबोधित केले.यावेळी त्यांनी ज्या ज्या संस्थांनी भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला अशा सर्व दानशूर व्यक्तींचे कौतुक करून त्यांचे आभार मानले व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दिव्यांग भगिनींना दिवाळी फराळ रेशन कीट आणि साडी वाटप करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस पी कमांडर डॉक्टर श्री मनीलाल शिंपी यांनी केले तर आभार प्रदर्शन अपंग सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री अशोक भोईर यांनी केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा, ग्रुप समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य,लेडीज एक्स्प्रेस ग्रुप कल्याण, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ.दिनेशभाई ठक्कर,इच्छामणी महिला भजनी मंडळ कल्याण,व राजस्थान शिंपी समाज कल्याण, या संस्थांचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अशोक भोईर यांनी विशेष मेहनत घेतली.

@राकेश चौबे (बेखौफ भारतीय), महाराष्ट्र


Bundelikhabar

Related posts

अक्सर चर्चा में रहने वाले आरटीओ साहब

Bundeli Khabar

कोपर पुल का उद्घाटन मुख्यमंत्री के हाथों सम्पन्न

Bundeli Khabar

पूर्व महापौर नरेश महास्के ने ठाणे जिला अध्यक्ष पद से दिया इस्तीफा

Bundeli Khabar
error: Content is protected !!