28.4 C
Madhya Pradesh
April 28, 2024
Bundeli Khabar
Home » महिला आयोग व मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा उद्या शुभारंभ
महाराष्ट्र

महिला आयोग व मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा उद्या शुभारंभ

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सदस्या ॲड. गौरी छाब्रिया, ॲड. संगीता चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, आभा पांडे, उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात राजकारण, समाजकार्य, प्रशासन क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना महिलांबाबतच्या खटल्यात संवेदनशीलतेने उल्लेखनीय कार्य केलेले पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, विधवा प्रथा बंदीचा ठराव करत ऐतिहासिक पाऊल उचलणारी हेरवाड ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सुरक्षिततेकरिता राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ, आयोगाच्या वर्ष २०२३ च्या दिनदर्शिका व नोंदवहीचे प्रकाशन, राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बिल्डिंग ब्रिज या टुलकिट पुस्तिकेचे प्रकाशन, हे कार्यक्रम यावेळी होणार आहेत.

Related posts

वडार समाज के अध्यक्ष पद पर बाबण्णा कुशाळकर

Bundeli Khabar

भाजपा उत्तर भारतीय मोर्चा के चिराग गुप्ता बने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष

Bundeli Khabar

सिविल्सडेली का यूपीएससी और एमपीएससी विद्यार्थियों के लिए नया सेंटर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!