23.5 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये तांत्रिक सहाय्य विषयक कार्यशाळा
महाराष्ट्र

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये तांत्रिक सहाय्य विषयक कार्यशाळा

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बदलत्या तंत्रज्ञानातील अद्यावतपणाचे आकलन विद्यार्थ्यांना व्हावे, यासाठी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक सहाय्य विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

यावेळी या क्षेत्रातील दिग्गज आस्थापने असलेले केपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, आयबीएम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले पायथन आणि एसक्यूएल याबाबतची माहितीदेखील विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच व्यावसायिक क्षेत्रातील अनेक बाबीदेखील समजून घेता आल्या. यात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विभागातील एकूण ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना कंपनीकडून प्रमाणपत्रे देण्यात आली. त्याचा उपयोग या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात होतो. संस्थेचे सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई, अध्यक्ष नंदकुमार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संचालक प्रा. अशोक चव्हाण, नियुक्ती अधिकारी स्वप्निल देसाई, विभागप्रमुख डॉ. रईस मुल्ला, डॉ. प्रदीप माने आणि डॉ. प्रमोद भावार्थे यांनी परिश्रम घेतले.


Bundelikhabar

Related posts

अभिनव अभ्यासक्रमाचा कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते प्रारंभ

Bundeli Khabar

इंग्लंडने पाकिस्तानला ५ गडी राखून पराभूत करून टी२० विश्वचषक जिंकला

Bundeli Khabar

पिंपळास गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा

Bundeli Khabar
error: Content is protected !!