23.7 C
Madhya Pradesh
October 4, 2026
Bundeli Khabar
IMG 20221119 WA0001
महाराष्ट्र

६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ

Bundelikhabar

6 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा मुंबई केंद्र १ (गिरगांव) केंद्रावरील प्राथमिक फेरीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. गिरगांव, मुंबई येथील साहित्य संघ या नाट्य गृहात हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उदघाटन सोहळ्यास दृक्श्राव्य माध्यमातून स्पर्धेतील सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.
राज्य नाट्य स्पर्धेतील पुरस्कारांची व मानधनाची ही रक्कम वाढवणार अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पवार, अभिनेते मकरंद पाध्ये रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री संजीवनी पाटील, नेपथ्य प्रकाश योजनाकार सुनील देवळेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी केंद्रावरील परीक्षक श्रीपाद जोशी, चंद्रपूर. किरण येवलेकर, चिंचवड, पुणे आणि मिलिंद दांडेकर यांचे स्वागत शब्धगुच्छ देऊन सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंचालक श्रीराम पांडे तर सूत्रसंचालन अभिनेत्री उर्वी सुकी यांनी केले.
उदघाटन नंतर इऑन लायब्ररी, नवीमुंबई या संस्थेच्या अजित देशमुख लिखित आणि चैत्राली कारदगे दिग्दर्शित मंथन या नाटकाचे सादरीकरण केले.


Bundelikhabar

Related posts

कैंसर को लेकर जागरूकता के लिए कैंथन मैराथन

Bundeli Khabar

अभातेयुप द्वारा ऐतिहासिक रक्तदान शिविर का आयोजन सम्पन्न

Bundeli Khabar

रसोई गैस के दाम में वृद्धी के खिलाफ , महिला राष्ट्रवादी कांग्रेस का अनोखा आंदोलन

Bundeli Khabar
error: Content is protected !!