28.7 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20221104 WA0034
खेल

अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : ग्लेन मॅक्सवेलने नाबाद अर्धशतकासह ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला, परंतु अफगाणिस्तानच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे यजमानांची बाद फेरी गाठण्याची शक्यता त्यांच्या हातातून गेली आहे, गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला आपली निव्वळ धावगती सुधारण्यासाठी अफगाणिस्तानला १०६ किंवा कमी धावांत रोखण्याची गरज होती. त्यांच्या गटातल्या अंतिम सामन्यात इंग्लंड श्रीलंकेशी सामना करणार आहे. नवीन-उल-हक आणि फझलहक फारुकी यांनी पाच विकेट्स घेतल्याने यजमानांनी मॅक्सवेलच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ८ बाद १६८ धावा केल्या. नवीन-उल-हकने डावाचं चौथं षटक केवळ ५ चेंडूत संपवले. पंचांनी अगदी सुमार दर्जाची कामगिरी केली. नवीन-उल-हक (३/२१) फजलहक फारुकी (२/२९) राशिद खान (१/२९) आणि मुजीब उर रहमान (१/४२) यांनी गडी बाद केले.

न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. आता फक्त श्रीलंकेने इंग्लंडवर मात केल्यास ऑस्ट्रेलियाला फायदा होईल आणि इंग्लंड जिंकल्यास पुढील टप्प्यात ते न्यूझीलंडसोबत सामील होतील.

अफगाणिस्तान हा एकमेव देश टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ मध्ये एकही सामना जिंकू शकला नसला तरीही त्यांनी जागतिक क्रिकेटसाठी त्यांचे मूल्य सिद्ध केले. गुरबाज १७ चेंडूंत ३० आणि गुलबदीन २३ चेंडूंत ३९ धावा काढल्या. या दोघांपैकी एकाने किंवा दोघांनी मोठी धावसंख्या उभारली असती तर कदाचित ते लक्ष्य ओलांडू शकले असते. रशीदची २३ चेंडूंत ४८ धावांची खेळी थोडक्याकरता कमी पडली. अॅडम झाम्पा (२/२२) जोश हेझलवूड (२/३३) आणि केन रीचर्डसन (१/४८) यांनी गडी बाद केले. ग्लेन मॅक्सवेललाला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


Bundelikhabar

Related posts

राजस्थानचा रॉयल विजय

Bundeli Khabar

डब्ल्यूडब्ल्यूआई ने 2022 के एडमिशन के लिए एंट्रेंस एक्ज़ाम की तारीख घोषित की

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – कोलकात्याने जबरदस्त सामना जिंकला

Bundeli Khabar
error: Content is protected !!