36.9 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – मुंबई इंडिअन्सचा सलग दुसरा विजय
खेल

टाटा आयपीएल – मुंबई इंडिअन्सचा सलग दुसरा विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा एक्कावनवा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडिअन्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला. मुंबई इंडिअन्सने ५ धावांनी हा सामना जिंकला. गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मुंबई इंडिअन्सकडून यष्टिरक्षक इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा सलामीसाठी उतरले. दोघेही चांगली फलंदाजी करत होते. दोघांची सलामीसाठी ७४ धावांची भागीदारी झाली.

रोहित शर्माने ५ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने २८ चेंडूंत ४३ धावा काढल्या. त्याला रशीद खानने पायचीत टिपले. सूर्यकुमार यादवला प्रदीप सांगवानने १३ धावांवर बाद केले. इशान किशनने ५ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने २९ चेंडूंत ४५ धावा काढल्या. त्याला अल्झारी जोसेफने बाद केले. १२व्या षटका अखेर मुंबई १११/३ पर्यंत पोहचले होते. रशीद खानने किरॉन पोलार्डचा केवळ ४ धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. तिलक वर्माला २१ धावांवर हार्दिक पांड्याने धावचीत केले. टिम डेव्हिडने २ चौकार आणि ४ षटकार यांच्या सहाय्याने २१ चेंडूंत नाबाद ४४ धावा काढल्या. त्यामुळे मुंबई इंडिअन्स १७७/६ अशी धावसंख्या उभारू शकला. रशीद खानने २४/२, प्रदीप सांगवान, अल्झारी जोसेफ आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल गुजरात टायटन्सकडून यष्टिरक्षक वृद्धिमान सहा आणि शुभमन गील यांनी शतकी सलामी दिली. मुरुगुन अश्विनने १३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शुभमन गीलला बाद केले तर शेवटच्या चेंडूवर वृद्धिमान सहाचा बळी घेतला. शुभमन गीलने ६ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने ३६ चेंडूंत ५२ धावा काढल्या. वृद्धिमान सहाने ६ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने ४० चेंडूंत ५५ धावा काढल्या. किरॉन पोलार्डने साई सुदर्शनला १४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. कर्णधार हार्दिक पांड्याला इशान किशनने २४ धावांवर धावबाद केले. गुजरातला विजयासाठी ६ चेंडूंमध्ये ९ धावांची गरज होती. राहुल तेवटीयाला तिलक वर्माने ३ धावांवर धावबाद केले. डॅनियल सॅम्सच्या शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना डेव्हिड मिलरला चेंडूला स्पर्शही करता आला नाही आणि डॅनियल सॅम्सने मुंबईला ५ धावांनी विजय मिळवून दिला. गुणतक्त्यात क्रमांक १ वर असणार्‍या गुजरातला मुंबई इंडिअन्सने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर नामोहरम केले. गुजरात टायटन्सने १७२/५ इतकीच मजल मारली. मुरुगुन अश्विनने २९/२, किरॉन पोलार्डने १३/१ गडी बाद केले.

टिम डेव्हिडला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने २१ चेंडूंत नाबाद ४४ धावा काढल्या. उद्याचा पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकात्ता क्नाईट रायडर्स यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर होणार आहे.

Related posts

गुजरात टायटन्सचा सहा गडी राखून विजय

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – बेंगळुरू ८ गडी राखून विजयी

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – पंजाब किंग्जचा ५४ धावांनी सफाईदार विजय

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!