29.1 C
Madhya Pradesh
October 18, 2024
Bundeli Khabar
Home » क्रिकेटच्या पंढरी रंगणार “पहिली मुंबई प्रीमियर लीग २०२१
खेल

क्रिकेटच्या पंढरी रंगणार “पहिली मुंबई प्रीमियर लीग २०२१

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईतील खेळाडूंना एक मोठी संधी मिळावी यासाठी फक्त मुंबईतील खेळाडूंसाठी ३ ते ५ डिसेंबर २०२१ ह्या कालावधीमध्ये “मुंबई प्रीमियर लीग २०२१” ही स्पर्धा आयोजित केली आहे.

मुंबईतील व्यासायिक खेळाडूंचा आणि नवोदित खेळाडूंचा समावेश असणार्‍या ८ संघांचा ह्यात समावेश असणार आहे. साधारण १५० खेळाडूंचा सहभाग ह्या स्पर्धेत असणार आहे.

खेळ म्हंटला की दुखापत ही आलीच पण खेळाडूंना कोणतीही दुखापत झाली तरी ताबडतोब त्यांना प्रथमोपचार देण्यासाठी आणि खेळण्यासाठी पुन्हा तयार करण्यासाठी मुंबई प्रीमियर लीगचे समन्वयक गुरुदत्त वाकदेकर यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईतील अग्रगण्य “ग्लोबल रूग्णालय” यांची रुग्णवाहिका आणि वैद्यकीय चमू स्पर्धा कालावधीमध्ये पुरंदरे मैदान, नायगाव-दादर येथे पूर्णवेळ उपलब्ध असणार आहे.

मुंबईतील क्रिकेटचा हा महसंग्राम अर्थात “मुंबई प्रीमियर लीग २०२१” स्पर्धा संपूर्ण जगात १५० पेक्षा जास्त देशात यूट्युब मार्फत थेट प्रसारित केली जाणार आहे. टेनिस क्रिकेटचे लाखो चाहते ही स्पर्धा यूट्युबच्या माध्यमातून पाहू शकतील.

Related posts

टाटा आयपीएल – कोलकाता क्नाईट रायडर्सचा ५२ धावांनी विजय

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – राजस्थानचा अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश

Bundeli Khabar

The Selection trials for the Sub-Junior & Cadet starts today in Mumbai

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!