36.8 C
Madhya Pradesh
May 6, 2024
Bundeli Khabar
Home » सेन्सेक्स ३०४ अंकांनी घसरले
व्यापार

सेन्सेक्स ३०४ अंकांनी घसरले

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २३ मार्च रोजी नुकत्याच झालेल्या तेजीनंतर बाजार सावध होत आहे. स्टील आणि अॅल्युमिनियमच्या समभागांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आज धातूंनी सामान्य कल वाढवला. पुरवठ्यातील अडचणींमुळे निर्माण झालेल्या चलनवाढीच्या दबावामुळे अस्थिरता परत आली आहे. जगाच्या काही भागांमध्ये कोविड प्रकरणांत सातत्याने वाढीचे, युद्ध समाप्तीच्या अनिश्चिततेचे वस्तूंच्या दरांवर परिणाम होत आहेत. युद्धाचा अंत आणि पुरवठा वाढणे भारताला लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करू शकते अन्यथा ते अल्पकालीन आव्हान असेल.

निफ्टी १७,३०० च्या खाली, तर सेन्सेक्स ३०४ अंकांनी घसरला. आरोग्यसेवा, धातू, तेल, वायू आणि उर्जा निर्देशांक सावरले, तर ऑटो, बँक, भांडवली बाजार आणि एफएमसीजीमध्ये विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सलग दुसर्‍या दिवशी फ्लॅट नोटवर थांबले. कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि सिप्ला हे निफ्टी घसरले, तर हिंदाल्को इंडस्ट्रीज, डिव्हिस लॅब्स, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, टाटा स्टील आणि यूपीएल हे फायदेशीर ठरले. सेन्सेक्स ३०४.४८ अंक किंवा ०.५३% घसरत ५७,६८४.८२ वर आणि निफ्टी ६९.८५ अंक किंवा ०.४०% घसरून १७,२४५.६५ वर थांबला. सुमारे १४२४ शेअर्स वाढले आहेत, १८९१ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि ११८ शेअर्स अपरिवर्तित आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया ७६.४४ वर बंद झाला

Related posts

आईएचसीएल ने शुरू किया अहमदाबाद में चौथा ‘जिंजर होटल’

Bundeli Khabar

सूर्या रोशनी ने लॉन्च की सीलिंग पंखों की नई रेंज

Bundeli Khabar

एमजी मोटर की पेशेवर गोल्फर त्वेसा मलिक के साथ साझेदारी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!