26.5 C
Madhya Pradesh
July 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20220215 WA0006
महाराष्ट्र

गाळेगाव तरे मार्केट येथे अज्ञातांनी पानटपरी जाळली

Bundelikhabar

दोन दिवसांपूर्वी याच दुकानात झाली होती चोरी

टिटवाळा : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाळेगाव तरे मार्केट येथे अज्ञात इसमांनी रात्रीच्या सुमारास पानटपरी जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात इसमांनी याच दुकानांमध्ये दोन दिवसापूर्वी टपरी फोडून पस्तीस ते चाळीस हजार रुपयांच्या मालाची चोरी केली होती.
दोन दिवसात लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून व्यापारी भयभीत झाले आहेत. गाळेगाव तरे मार्केट येथे महेंद्र पान शॉप नावाची पान टपरी आहे रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी दुकानात पेट्रोल ओतून पान टपरी जाळली असल्याचा संशय महेंद्र बिंद यांनी व्यक्त केला आहे. याबाबत रीतसर कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र बिंद यांचे 80 ते 90 हजार रुपयाचे नुकसान झाले असून त्यांच्या दुकानात एकदा चोरी तर दुसऱ्यांदा अज्ञात इसमांनी दुकान जाळल्याची घटना घडल्याने महेंद्र बिंद हे हवालदिल झाले असून सततच्या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

चोरट्यांचा आणि दुकान जाळणाऱ्या अज्ञात इसमाचा पोलिसांनी बंदोबस्त न केल्यास गाळेगाव परिसरात चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता आहे.
या चोरी व दुकान जाळल्याच्या घटनेबाबत टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू डी. वंजारी यांना विचारले असता टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी गस्त घालण्याचे काम सुरू असून मध्यंतरी काळात मनुष्यबळ कमी असल्याने गाळेगाव परिसरातील गस्त घालणे बंद झाले होते. लवकरच गस्त वाढविण्यात येतील तसेच चोरी व दुकान जाळण्याच्या घटनेचा तपास वरिष्ठ पातळीवर करून आरोपींना तातडीने अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी व्यापाऱ्यांना दिले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारे यांनी व्यापारी वर्गाला आश्वासन दिले असले तरी आरोपींना कधी अटक होते याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.


Bundelikhabar

Related posts

मनोरमा साहित्य पुरस्कार २०२१ जाहीर

Bundeli Khabar

MCU का हिस्सा बनने के लिए शाहरुख से बेहतर भला और कौन हो सकता है! ख़ान इज़ ग्रेट : डॉ स्ट्रेंज (बेनेडिक्ट कम्बरबैच)

Bundeli Khabar

फरिश्ता सोशल फाउंडेशन के द्वारा रेहा खान ने जरूरतमंदों को बांटा राशन किट

Bundeli Khabar
error: Content is protected !!