24.4 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20211224 WA0016
मनोरंजन

अनुपम खेर अभिनीत ‘द काश्मीर फाईल’च्या टिझरने’ कू’वर वाढवली उत्सुकता

Bundelikhabar

संतोष साहू/महाराष्ट्र,
मुम्बई। ‘द काश्मीर फाईल’ या ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर यांच्या आगामी चित्रपटाच्या “कु’ अपवर प्रदर्शित टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आपले घरदार सोडून काश्मीरमधून जीव मुठीत धरून पलायन केलेल्या काश्मीरी पंडितांना अजूनही तिथे परत जाता आलेले नाही. या मागचे नेमकी कथा या चित्रटात आहे.

अनुपम खेर यांनी ‘द काश्मीर फाईल’ हा चित्रपट त्यांचे वडील पुष्करनाथ यांना अर्पण केला आहे. माझ्याकरीता हा केवळ चित्रपटच नाही. तर गेल्या ३० वर्षांपासून जगापासून लपवून ठेवले आहे. पण, आता हे सत्य जगासमोर येणार आहे, असे अनुपम खेर यांनी ‘कु’ अपवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या चित्रपटात जम्मु काश्मीरचे निवृत्त विभागीय आयुक्त ब्रम्ह भट्ट यांची भूमिका मिथुन चक्रवर्ती यांनी केली आहे. तर प्रोफेसर राधिका मेनन यांची भूमिका पल्लवी जोशी यांनी केली आहे. येत्या २६ जानेवारी २०२२ रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे लेखन विवेक अग्निहोत्री आणि सौरभ एम. पांडे यांचे असून दिग्दर्शन विवेक अग्निहोत्रीचे आहे. या तिघां व्यतिरिक्त या चित्रपटात चिन्मय मंडलेकर, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, प्रकाश बेलवाडी आदींच्या दमदार भूमिका आहे.

कू लिंक -https://www.kooapp.com/koo/anupampkher/36398df6-41d1-4f0b-b1f8-04c904e2d798


Bundelikhabar

Related posts

ऋतिक रोशन एक कम्पलीट हीरो हैं : फाइटर के निर्देशक सिद्धार्थ आनंद

Bundeli Khabar

कृष्णा शांति प्रोडक्शन ने फिल्म ‘इश्क़ पशमीना’ का मोशन पोस्टर किया लॉन्च

Bundeli Khabar

समर सिंह के साथ पाखी हेगड़े का ‘कमरिया ऑटोमेटिक लेफ्ट राइट’ मचा रहा धमाल

Bundeli Khabar
error: Content is protected !!