41.4 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » राज्यपाल सन्मानित संपादक डॉ.श्री.किशोर पाटील यांना नागपूर येथे ” जीवन गौरव २०२१ ” पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र

राज्यपाल सन्मानित संपादक डॉ.श्री.किशोर पाटील यांना नागपूर येथे ” जीवन गौरव २०२१ ” पुरस्कार प्रदान

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कैलास नगर वळपाडा या छोट्याशा गावातील ह.भ.प.श्री.बळीराम दादाजी पाटील व ह.भ.प.सौ.पार्वतीबाई बळीराम पाटील या शेतकरी दांपत्यांचे सुपुत्र डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील हे गेली २७ वर्ष पत्रकारिता करत असुन ते स्वराज्य तोरण दैनिकाचे संपादक आहेत. तसेच ते महाराष्ट्र शासनाचे अधिस्विकृति धारक पत्रकार आहेत.त्याच प्रमाणे ते महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्यस्तरीय सदस्य आहेत. व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस आहेत. व शासकीय समित्यांवर सदस्य आहेत . व गेली १४ वर्ष पत्रकारिता व १३ वर्ष दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक म्हणून काम करीत आहेत. त्यानी आपल्या लेखणीतून सामाजिक बाधीलकी जपत निपक्ष पाती राहुन सर्व समाज बधावांच्या अनेक समस्या सोडऊन त्यांना न्याय मिलऊन दिला आहे.व गेली दोन वर्ष पत्रकारांना कोव्हिड् १९ काळात मोलाचे सहकार्य करून ते खंबीरपणे पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले व पत्रकारांना मदतीचा हात पुढे केला. याची दखल घेऊन महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ भुवनेश्वर ओडिसा राज्य यांनी पत्रकार क्षेत्रातील मानद डॉक्टरेट मिळविण्याचा पहिला मान ,संपादक श्री किशोर बळीराम पाटील यांना मिळाला तसेच त्यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ ओडिसा राज्य व निती आयोग पुरस्कृत कोरोनायोद्धा समाजसेवा रत्न गौरव पुरस्कार व मानद डॉक्टरेट पदवीने राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्माननीय श्री. भगतसिंग कोश्यारी व महाराष्ट्र राज्य आर.एस.पी चे महासमादेशक डॉ.श्री अरविंद देशमुख यांच्या शुभहस्ते व आर एस पी कल्याण-ठाणे युनिटचे कमांडर तथा महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँबेसिडर डॉ. श्री. मणिलाल रतिलाल शिंपी यांच्या खास उपस्थितीत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आल्यानंतर या सन्मानाची दखल घेऊन केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी दिल्ली यांच्या वतीने १० डिसेंबर २०२१ रोजी मानव अधिकार दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राष्ट्रभाषा पुणे नागपूर विभाग श्री साई सभाग्रह येथे मा.श्री.अभिजित देशमुख न्यायाधीश नागपूर, मा.श्री.संजय पांडे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर,आर एस पी कल्याण-ठाणे युनिटचे कमांडर तथा महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँबेसिडर डॉ.श्री. मणिलाल रतिलाल शिंपी मा.श्री. दिपक कदम चित्रपट निर्माते मुंबई ,गाव वाले गोत्यात १५ लाख खात्यात या मराठी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री सौ.अश्विनी चंद्रकापुरे ,मा. ब्रह्मकुमारी मनीषा दीदी, केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी- दिल्ली चे संस्थापक अध्यक्ष डॉ.मिलिद दहीवले यांच्या शुभहस्ते दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील,यांचा जीवन गौरव २०२१ या पुरस्काराने सन्मानपूर्वक सन्मान करण्यात् आला।

त्याबद्दल त्यांचे दैनिक स्वराज्य तोरण मित्र परिवार , केंद्रीय पंचायती राज्यमंत्री मा.ना.श्री.कपिल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री प्रकाश पाटील ,सहकार महर्षी तथा शिवसेना तालुका श्री विश्वास थळे ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री डी. के. म्हात्रे,मा.ना.श्री.शांताराम मोरे,मा.आ.श्री. महेश चौघुले,माजी आमदार श्री. रूपेश दादा म्हात्रे , समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉ. सोन्या पाटील, ठाणे जिल्हा भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री दयानंद चोरघे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाल्या मामा), शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.देवानंद थळे, भिवंडी शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष श्री संतोष शेट्टी,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती श्री. कुंदन पाटील,शिवसेना शहराध्यक्ष श्री सुभाष माने, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. पि.के.म्हात्रे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक श्री संजय जी भोकरे, प्रदेशाध्यक्ष श्री वसंत मुंडे, सरचिटणीस श्री विश्वासराव आरोटे, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख श्री नवनाथ जाधव, कोकण विभागीय अध्यक्ष श्री नितीन शिंदे ,ठाणे जिल्ह्यातील तसेच कोकण विभागातील सर्व पत्रकार संघटना व पत्रकार याच्यावतीने तसेच ग्रामस्थ मंडळ कैलास नगर वळपाडा, वळ्गांव, व संपूर्ण पाटील कुटुंबियांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढिल् वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा।

Related posts

Bundeli Khabar

प्रिंस ऑफ पॉप अरमान मलिक का नया तमिल गाना एप्पा पार्थालम हुआ रिलीज़

Bundeli Khabar

आत्मदर्शन चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने अपंगांना मोफत धान्य वाटप कार्यक्रम संपन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!