39.8 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » बेरोजगारी विरोधात युवकांनी रस्त्यावर उतरून निषेध करायला हवा – राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांचे आवाहन
महाराष्ट्र

बेरोजगारी विरोधात युवकांनी रस्त्यावर उतरून निषेध करायला हवा – राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांचे आवाहन

◆ राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडारशेठ पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

प्रमोद कुमार/ मुम्बई

डोंबिवली :- बेरोजगारी प्रचंड वाढली असून त्यासंदर्भात जास्तीत जास्त युवकांनी केंद्र शासनाविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे. रोजगार हा आपल्या सर्वांचा हक्क असून तो आपल्याला मिळालाच पाहिजे. तसं मतदानाचा अधिकार बजावलाच सांगितलं जातं त्याचप्रमाणे रोजगाराची जबाबदारी देखील केंद्र सरकारची आहे , परंतु हे केंद्र सरकार रोजगारी पासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात अपयशी झालेले आहे. महागाईचा भस्मासुर वाढला आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे नागरिक असंतुष्ट आहेत यासाठी संघटित होऊन संघर्ष करायला हवा असे आव्हान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी केले।

राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण-डोंबिवली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष डॉ वंडारशेठ पाटील यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी नवनिर्वाचित ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी जमा झालेल्या युवकांना त्यांनी मार्गदर्शन करताना वरील आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संघर्षाने उभा राहिला असून पक्षाचे सुप्रिमो आदरणीय पवार साहेबांनी पक्षाला घडवले आहे. त्यामुळे त्याच बळावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवकांना निश्चित मार्गदर्शन करण्यात येईल. असे आव्हान सर्वस्तरातून करण्यात आले असल्याने युवकांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी पक्ष स्तरावर विविध उपक्रम योजना राबवण्याचा मानस आहे. महिला सबलीकरण करणे देखील गरजेचे आहे, महिला सबलीकरण करताना सक्षमीकरण करण्याची गरज असल्याने महिला आयोगाच्या माध्यमातून आगामी काळात होणारे अत्याचार हे दूर करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे।

अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर शासन करून ही वृत्ती कशी बळवणार नाही यावर भर देण्याचा आपला मानस आहे. संस्कृती आणि परंपरा युवा पिढीवर जास्तीत-जास्त बिंबवणे ही काळाची गरज असल्याचे वाटते. त्याच बरोबर पक्ष वाढीची जबाबदारी सुधीर पाटील यांना दिली आहे. त्यामुळे निश्चित ठाणे जिल्ह्यामद्धे युवा वर्गाला चालना मिळून त्यांना निश्चित या पक्षामध्ये स्थान मिळेल. जेणेकरून पक्षाला बळकटी मिळल्यासोबत युवकांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळेल आणि त्यांना देखील स्वतःचा आवाज बुलंद करण्याची संधी मिळेल असे मार्गदर्शन रूपालीताई चाकणकर यांनी केले. यावेळी निरीक्षक मायाताई कटारिया, महिला जिल्हाध्यक्षा सारिकाताई गायकवाड, सुरय्या पटेल, विनिया पाटील, उज्ज्वला भोसले, सुनीता देशमुख, मिनाक्षी अहिर, ज्योती पाटील, बबिता राम त्याच बरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रशांत नगरकर, सुनील बोरणाक, कल्पेश अहिरे, आकाश कांबळे, शशांक माने, ओम सावंत, रोहन साळवे, भावेश सोनवणे, विश्वास आव्हाड, प्रसाद गायकवाड, तुषार म्हात्रे, संतोष जाधव, वैभव माळी, स्वप्नील चौधरी, योगेश माळी, ब्रिजेश कांबळे, गिरीश पाटील, नितीन लोहोटे, मयुर गायकवाड, प्रशांत भगत, वैभव मोरे, पंडित म्हात्रे, सत्यवान पाटील, धिरज राजभोज, निलेश काठवले, गणेश भोईर, दत्ता भोईर, शरद म्हात्रे आदी युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।

Related posts

“Gansaraswati” Award Announced to Anuradha Kuber

Bundeli Khabar

संपादक किशोर पाटील यांना पत्रकार क्षेत्रातील मानद डॉक्टरेट मिळवण्याचा पहिला मान

Bundeli Khabar

महाडच्या महास्वच्छता अभियानास सुरुवात, नगरविकासमंत्री स्वतः रस्त्यावर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!