29.4 C
Madhya Pradesh
April 29, 2024
Bundeli Khabar
Home » ज्युडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेची सांगता
खेल

ज्युडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेची सांगता

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्युडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेची सांगता अध्यक्ष प्रताप सिंग बाजवा यांच्या उपस्थितीत झाली. पुरुष गटात दिल्ली, हरियाणा, मणिपूर पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राचे स्थान राहिले तर त्या खालोखाल पंजाब आणि उत्तराखंड राज्यांनी पदकांची लयलूट केली. महिला गटात हरियाणा, दिल्ली, पंजाब, छतीसगड आणी आंध्र प्रदेश राज्यांचे स्थान अव्वल राहिले.

नॅशनल सब ज्युनिअर गटातील वजनी गटानुसारचे सुवर्णपदक विजेते असे – ३० किलो – वेदांत मुधोळकर (महाराष्ट्र), ३५ किलो – साहिल (पंजाब), ४० किलो – मयंक तोकस (दिल्ली), ४५ किलो – इंदर प्रकाश सिंग, ५० किलो – नकुल अरोरा (पंजाब), ५५ किलो – आशिष (राजस्थान), ६० किलो – जतीन (हरियाणा), ६६ किलो – कृष शर्मा, ६६ किलोवरील – स्वर्ण ऋषव. महिलांचे निकाल – २८ किलो – हेबाटी (चंदीगड), ३२ किलो – वानिषा (हरियाणा), ३६ किलो – के. सोम्या राणी, ४० किलो – गरिमा, ४४ किलो – युविका (दिल्ली), ४८ किलो – सोफिया (दिल्ली), ५२ किलो – स्टॅन्झिन डेचन (दिल्ली), ५७ किलो – राणी मनप्रीत (हरियाणा), ५७ किलोवरील – कौर कंवरप्रीत (पंजाब).

नॅशनल कॅडेट गटातील वजनी गटानुसारचे सुवर्णपदक विजेते असे – ५० किलो – अनुराग सागर (दिल्ली), ५५ किलो – जतीन (हरियाणा), ६० किलो – सिद्धार्थ रावत (उत्तराखंड), ६६ किलो – बल्हारा तनिश (दिल्ली), ७३ किलो – मॅक्स लैशरन (मणिपूर), ८१ किलो – एन. सेफटल (मणिपूर), ९० किलो – अनिल (हरियाणा), ९० किलोवरील– मन्विंदर (हरियाणा). महिला गट – ४० किलो – अंजली (हरियाणा), ४४ किलो – श्रद्धा घोरपडे (महाराष्ट्र), ४८ किलो – मान तनु (दिल्ली), ५२ किलो – टोकस तनिष्ठ् (दिल्ली), ५७ किलो – लिंथन, ६३ किलो – टोकस हिमांशी, ७० किलो – नंदिनी वट्स (दिल्ली), ७० किलोवरील – नारंघ इशरुप (पंजाब).

महाराष्ट्रानेही यावेळी बक्षिसांची लयलूट केली. ४४ किलो वजनी गटात श्रद्धा घोरपडे (क्रीडा प्रबोधिनी) हिला सुवर्णपदक मिळाले. ६६ किलो वजनी गटात नाशिकच्या इशान सोनावणे याने कास्य पदक मिळवले. ५७ किलो वजनी गट – शायना देशपांडे, ठाणे हिला रौप्यपदक, ६३ किलो वजनी गट – गौतमी कांचन- रौप्यपदक, ७० किलो वजनी गट – समीक्षा शेलार, पुणे – रौप्यपदक, ७० किलो वजनी गट – शिवानी कापसे, नागपूर – रौप्यपदक, ९० किलो वजनी गटात – आदित्य परब – कास्यपदक अशी महाराष्ट्रातील खेळाडूंची कामगिरी राहिली. दुस-या विभागात ३० किलो वजनी गट – वेदांत मुधोळकर, यवतमाळ – सुवर्णपदक, २८ किलो वजनी गट वैभवी आहेर, नाशिक – रौप्यपदक, ४० किलो वजनी गट – रुद्राक्ष तांबोळकर – कास्य पदक, ४४ किलो वजनी गट – भक्ती भोसले, ठाणे – कास्यपदक. ज्येष्ठ राष्ट्रीय प्रशिक्षक यतीश बंगेरा, आंतरराष्ट्रीय पंच योगेश धाडवे, राष्ट्रीय पंच शिल्पा शेरीकर, विजय यादव यांचाही या स्पर्धेत सहभाग राहिला.

Related posts

भारताचा वेस्ट इंडिजवर ६८ धावांनी विजय

Bundeli Khabar

सुप्रीमो ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंट: सीजन 9 की घोषणा

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – सनरायझर्स हैदराबादचा योजनाबद्ध विजय

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!