23.5 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20211102 WA0011
महाराष्ट्र

आयग्रीडमध्ये जोरदार कर्मचारी भरती

Bundelikhabar

संतोष साहू/महाराष्ट्र,

मुंबई : भारताचा अग्रगण्य ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि लाइफस्टाइल ब्रँड आयग्रीड (iGRiD) यंदाच्या सणासुदीच्या हंगामात अनेक नवी उत्पादने लाँच करण्यासाठी सज्ज झाला आहे. ब्रँडला आधीच वाढत्या मागणी व पुरवठ्यासोबतच जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ब्रँडच्या उत्पादन मालिकेत नव्या वस्तू जोडल्या जात असल्यामुळे रोजगारातही वाढ होणार आहे. नव्या हंगामातील युनिसेक्स कलेक्शनचा समावेश असलेली उत्पादनांची नवी श्रेणीही लॉन्चिंगसाठी सज्ज झाली आहे. तसेच संस्थात्मक गरजांमुळे कंपनीने चालू वित्तवर्षात १००+ व्यावसायिकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी आयग्रीडने २०+ कर्मचाऱ्यांच्या कार्यबलानिशी काम केलेले आहे. मात्र, अलीकडेच कंपनीने सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट कर्मचारी भरती करून आपली क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयग्रीडच्या नवीनतम उत्पादन मालिकेत चेहरा व केश या दोन्ही श्रेणींच्या उत्पादनांचा समावेश असणार आहे. त्यात आयन मसाजर, फेशिअल फाइन हेअर ट्रिमर्स, फेशिअल आयोनिक सौना, डीप कोअर डिव्हाइसेस हेअर : ड्रायर, कर्लर्स, हेअर स्ट्रेटनिंग ब्रेशेज, कॅलस रिमूव्हर्स आणि सेमी प्रीमियम रेंजमधील अनेक उत्पादने समाविष्ट आहेत.
आयग्रीडचे संस्थापक आणि संचालक माधव कोटा म्हणाले की, “ग्राहकांकडून मिळणारा भरीव प्रतिसाद आणि बाजारपेठेतील जोरदार मागणीमुळे आम्ही हेअर तसेच फेस श्रेणीत १५ नवीन उत्पादने लॉन्च करत आहोत. आमच्या नवकल्पनांच्या माध्यमातून आम्ही सेमी प्रीमियम श्रेणीत पाऊल टाकण्यासाठी सज्ज झालो आहोत. आमची नवीनतम उत्पादने ही अतिशय वाजवी दरांत असतीलच. तसेच ती दर्जेदार असतील, याचीही खात्री मिळेल.”


Bundelikhabar

Related posts

ह्रदयाच्या खोलीत उतरणारी मैत्रीची “ऊंचाई”

Bundeli Khabar

ठाणे जिल्हा जलतरण संघटने च्या वतीने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न

Bundeli Khabar

गावाखेड्यातून संविधान जनजागृतीची गरज – नंदेश उमप

Bundeli Khabar
error: Content is protected !!