25.7 C
Madhya Pradesh
April 27, 2024
Bundeli Khabar
Home » महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या प्रयत्नाने उल्हासनगरमधील शिक्षकांचे रखडलेले काम ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने पूर्ण
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या प्रयत्नाने उल्हासनगरमधील शिक्षकांचे रखडलेले काम ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पुढाकाराने पूर्ण

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : विकास मंदिर सेमी इंग्रजी प्राथमिक विद्यालय उल्हासनगर ४ शाळेतील ३ शिक्षकांचे शाळा अंशतः अनुदानावर असताना सहाय्यक शिक्षक ऐवजी शिक्षणसेवक म्हणून मान्यता दिली गेली होती. सदर मान्यता दुरुस्त करण्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापकांनी माननीय प्रशासन अधिकारी उल्हासनगर महानगरपालिका यांच्याकडे 23 मार्च 20२१ रोजी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावा संबंधात शाळेच्या संस्थेचे संस्थाध्यक्ष व्ही व्ही पाटील गेल्या अनेक दिवसापासून उल्हासनगर महापालिकेत प्रशासन अधिकार्यानकडे फेऱ्या मारत होते. सदरची बाब संस्था अध्यक्ष पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष .ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कानावर टाकली.

   ज्ञानेश्वर म्हात्रे  यांनी  कार्यकर्त्यांसह  उल्हासनगर महापालिकेमध्ये   शिवसेनेच्या महापौर  आदरणीय  श्रीमती  लीलाताई आशान  यांच्या  दालनात  शिवसेनेचे  गटनेते    धनंजय बोडारे व अरुण अशान   यांच्या सोबत जाऊन सदर प्रलंबित कामाबद्दल   सविस्तर चर्चा केली.त्यामुले 

आदरणीय अरुन अशांन यांनी तातडीने शिक्षण सभापती श्रीमती शुभांगी बहणवाल व प्रशासन अधिकारी मोहिते यांना केबीनमध्ये बोलवून.त्यांना सांगितले की,
ज्ञानेश्वर म्हात्रे हे काम घेऊन आले आहेत, याच ठिकाणी तातडीने त्यांचे काम झालेच पाहिजे असे अरुण अशांन यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना सांगितले, त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या शिक्षण समिती सभापतीनी सदर मान्यतेस होकार देऊन प्रशासन अधिकाऱ्यांना याच ठिकाणी सही करून प्रलंबित असलेले काम करण्याचे आदेश दिले.

प्रशासन अधिकारी. मोहिते यांनी क्षणाचा ही विलंब न करता तयार करून आणलेल्या ऑर्डरवर सही करून संस्थेचे अध्यक्ष विकास. पाटील , यांच्याहाती ज्ञानेश्वर म्हात्रे , अरुण आशान, प्रशासनाधिकारी मोहिते यांच्या उपस्थितीत शिक्षण सभापतीं श्रीमती शुभांगी बहनवाल यांच्या हस्ते सदरिल कामाचे आदेश देण्यात आले.
चार महिन्यांपासून रखडलेले काम एवढ्या जलद गतीने झाल्यामुळे त्या शिक्षकांना आनंद झाला. शिक्षक सेनेची ताकद तसेच शिवसेनेच्या लोकांची काम करण्याची पद्धत पाहून अध्यक्ष पाटील थक्क झाले व आनंद व्यक्त करून शिक्षक सेना व शिवसेनेचे आभार मानले .काम पूर्ण करून देण्यासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे,अरुण अशांन यांची काम करण्याची वेगळी पद्धत व सभापती श्रीमती शुभांगी बहनवाल , प्रशासन अधिकारी मोहिते साहेब यांचे विकास मंदिर शाळेकडून आभार मानण्यात आले.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य प्राध्यापक सेनेचे उपाध्यक्ष सतीश शिरसाट व ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे उपाध्यक्ष विलास आंग्रे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.अशी माहिती उल्हासनगर शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्रकाश मगर यांनी दिली.

Related posts

फॅमिली बॉईज ग्रुप ची पूरग्रस्तांना मदत.

Bundeli Khabar

संकट संपलेलं नाही

Bundeli Khabar

रिक्षाचालकां करिता अपघात विमा व पेन्शन योजना सुरु करणार – शिरीष चव्हाण

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!