28 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210927 WA0013
महाराष्ट्र

मेल्ट्रोनसह 9 हॉस्पिटलच्या विकासासाठी निधीची मागणी: मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
औरंगाबाद : (मनपा आयुक्त कार्यालय) मेल्ट्रोन रुग्णालयाच्या विकासासाठी 22 कोटी तसेच इतर 9 रुग्णालयाचे अत्याधुनिक कीकरण करण्यासाठी निधीची मागणी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आज रविवारी केली असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी दिली।

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांच्या उपस्थितीत सिव्हिल हॉस्पिटल येथे झालेल्या बैठकीत आरोग्य संदर्भातील प्रलंबित विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला सिव्हिल सर्जन मुरंबी कर, डीएचओ शेळके व महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा हे उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंडलेचा यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका आरोग्य केंद्राच्या तसेच विभागाच्या विकासासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना महानगरपालिका रुग्णालयाच्या अद्याधुनिकीकरण करण्यासाठी निधीची मागणी केली त्यात मेल्ट्रोन रुग्णालयाच्या विकासासाठी निधीची मागणी केली असून जिनो सिक्वेन्सिग लॅब आणि संसर्गजन्य हॉस्पिटल म्हणून विकास करण्यासाठी बावीस कोटी रुपयांची तर महानगरपालिकेच्या नऊ हॉस्पिटलमध्ये डायलेसिस युनिट, सोनोग्राफी सेंटर, नेत्र चिकित्सक सेंटर, 24 तास मॅटर्निटी हॉस्पिटल आदी अद्यावत सेवेसाठी करण्यासाठी निधीची मागणी केली आहे. तसेच कोविड टेस्टिंग, व्हॅक्सिनेशन वाढवण्यासाठी मनुष्यबळ लागणार असून त्यांच्या पगारासाठी एस डी आर एफ फंडातून निधी देण्याची मागणी ही डॉक्टर पारस मंडलेचा यांनी केली आहे।

मनपाच्या उर्वरित 26 आरोग्य केंद्रांना महा लॅब सेवा देण्याचे आरोग्य मंत्री चे आदेश विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या 40 आरोग्य केंद्र पैकी फक्त 14 आरोग्य केंद्रात महालॅब ची सेवा देण्यात येते. उर्वरित 26 आरोग्य केंद्राला ही महा लॅब ची सेवा देण्यात यावी, या मागणीची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दखल घेऊन मुंबईची आरोग्य संचालक डॉक्टर सतीश पवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून महानगरपालिकेच्या 26 आरोग्य केंद्राला महा लॅब सेवा देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती डॉक्टर पारस मंडलेचा यांनी दिली।


Bundelikhabar

Related posts

महाराष्ट्र विधानसभा में मुंबई से राज ठाकरे की महाराष्ट्र नव निर्माण सेना कर सकती हैं दमदार वापसी …

Bundeli Khabar

ऑक्टोपस स्पेशल फोर्स के साथ अभिनेता अदिवि शेष की विशेष भेंट

Bundeli Khabar

चोरवणे निवे सापिर्ली गावे महाराष्ट्रातच आहेत ना

Bundeli Khabar
error: Content is protected !!