41.4 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिक्षक पत्रकारांचा सन्मान
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिक्षक पत्रकारांचा सन्मान

किशोर पाटील/महाराष्ट्र
अहमदनगर : शिक्षका हाच तुझा सत्कार तुझे शिष्य ते थोर हुत्तामे जग ज्यांना वंदन करीतो .गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः याप्रमाणे आदर्श भारताचे नागरिक घडविण्याचे काम शिक्षकांकडून सुरू असते शिक्षक हा देखील एक माणूस असून विद्यार्थ्यांना घडवित असताना त्याच्या कलागुणांना वाव देण्याचे काम तो करत असतो प्रत्येक विद्यार्थी त्याच्या क्षेत्रामध्ये वेगळेपण दाखवत असला तरी त्याच्या कार्यकर्तृत्वाने त्याला घडविणारे शिक्षक हेच खरे त्याचे मार्गदर्शक असतात रविवार दि.५/९/२०२१ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अकोले तालुक्यातील पत्रकार शिक्षक बांधवांचा यथोचित सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला।


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी स्विकारले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार माजी प्राचार्य तथा साहित्यिक व लेखक शांताराम गजे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल रहाणे ,प्राध्यापक डि के वैद्य, शिक्षण तज्ञ भाऊसाहेब चासकर,अमोल वैद्य प्रकाश आरोटे, संजय शिंदे.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोक उगले, कार्याध्यक्ष दत्ता जाधव,जगन्नाथ आहेर आदींसह सर्व पत्रकार उपस्थित होते.
कळसुबाई पर्वत रांगांमधील वसलेल्या पत्रकारितेच्या माध्यमातील शिक्षकांनी दाखविला संपूर्ण राज्याला इतिहास. शिक्षक बनले या राज्यातील विविध विभागीय पातळीवर गुंणवत ,राज्याचे आजी माजी शिक्षण मंत्री ही घेतात या पत्रकार शिक्षकांचे मार्गदर्शन ।


डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक हे शैक्षणिक क्षेत्रात तर आपले काम निस्वार्थीपणे करतच असतात परंतु सामाजिक क्षेत्रात ही शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे एक शिक्षक देशाचा उपराष्ट्रपती राष्ट्रपती होऊ शकतो तर इतर कोणत्याही क्षेत्रात शिक्षक आपल्या कार्याचा ठसा उमटवु शकतो अशाच प्रकारे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असून त्यांच्या कामाचा सन्मान व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षक पत्रकार बांधवांचा उचित सन्मान केला गेला असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार शांताराम गजे यांनी व्यक्त केले ।


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान, शैक्षणिक साहित्य वाटप ,आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर,असे छोटे मोठे उपक्रम नेहमीच राबविले जात असतात. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आतापर्यंत १६ राज्यस्तरीय अधिवेशन घेतलेले असून कोरोना काळातही अनेक कुटुंबांसाठी किराणा साहित्य , औषध साहित्य ,मास्क, सॅनिटायझर चे वाटप मोफत अॅबुंलन्स सेवा,मोफत हेल्मेट वाटप,अशा प्रकारचे काम करण्यात आले आहे.कोरोना काळामध्ये ३४५ पत्रकारांचा मृत्यू झाला असून त्या सर्व पत्रकारांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्वरूपाची मदत देण्यात आली, कोरोना काळात गोरगरिबांसाठी मोफत किराणा.पुरग्रस्त महाड चिपळुण.या भागात ४ ट्रक किराणा.अत्यावश्यक साहीत्य वाटप करण्यात आले.या सर्व कामासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रयत्नशील आहे व कायम राहील.राज्यात पत्रकारांच्या कितीही संघटना असल्या तरी कोणत्याही पत्रकारावर अन्याय झाला तर त्याच्या पाठीशी खंबीर पने उभे राहणे आपल्या सर्वांचे काम आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन च आपले जीवन सफल करते आज शिक्षक दिनाचे औचित्य साधत पत्रकारितेमध्ये काम करत असलेल्या सर्व शिक्षक बांधवांचा आजच्या दिवशी सन्मान होणे हे आमच्या दृष्टीने भाग्याचे समजतो असे मत अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना राज्य सरचिटणीस श्री. विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केले।


यावेळी शिक्षक पत्रकार शांताराम गजे ,प्रकाश आरोटे भाऊसाहेब चासकर ,डि के वैद्य ,अनिल रहाणे विद्या चंद्र सातपुते संजय शिंदे , संदीप वाकचौरे प्रकाश महाले रमेश खरबस ,दत्ता जाधव सचिन लगड ,अनिल नाईकवाडी नीलेश वाकचौरे आदी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी भाऊसाहेब चासकर, प्रकाश आरोटे, अनिल राहणे डि के वैद्य ,शांताराम गजे यांनीही आप आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल नाईकवाडी यांनी मानले।

Related posts

“स्वामी” च्या नेत्रतपासणी शिबिरास उदंड प्रतिसाद

Bundeli Khabar

सेंद्रिय पद्धतीने भाज्या पिकवल्या तर स्वतःच आरोग्य आणि कुटुंबाचे आरोग्य चांगले राखू शकते- डॉ.संगिता तोडमल

Bundeli Khabar

लिव्हप्युअरने स्मार्ट होम अप्लायन्सेसची श्रेणी लॉन्च केली

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!